दिघीत संस्कारांचा महासोहळा! गुरु पूजन, मातृ-पितृ पाद्य पूजनाने भारावले वातावरण

काशिनाथ शिंदे: दिघी पुणे

बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने दिघी येथे परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन आशीर्वादाने तसेच गुरुपुत्र आदरणीय नितीनभाऊ आणि श्री सतीश दादा मोटे यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत गुरु पूजन, मातृ-पितृ पाद्य पूजनसरस्वती पूजन संस्कार सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या संस्कारमय कार्यक्रमाला बालक, युवक, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि कृतज्ञतेच्या भावनेने भारावून गेला.

यावेळी गुरुपुत्र नितीनभाऊ यांनी भारतीय संस्कृतीतील गुरूंचे स्थान, मातृ-पितृ सेवेचे महत्त्व, संस्कारमय जीवनाची गरज आणि भावी पिढीच्या चारित्र्यनिर्मितीसाठी आवश्यक मूल्ये यावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना संस्कारांचे महत्त्व नव्याने जाणवले.

यानंतर उपस्थितांनी आपल्या आई-वडिलांचे विधिवत मातृ-पितृ पाद्य पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला. तसेच सरस्वती पूजनातून ज्ञान, संस्कार आणि उज्ज्वल भवितव्याची प्रार्थना करण्यात आली.

कार्यक्रमाला माजी नगरसेवक योगेशभाऊ लांडगे, उदयभाऊ गायकवाड, विलासभाऊ मडेगिरी, विकासभाऊ डोळस, नगरसेविका अर्चना ताई सस्ते, सारिका ताई बोराटे, सारिका ताई लांडगे, कविता ताई भोंगाले, नवी महाराजा करिअर अकॅडमीचे विशालभाऊ कावळे, ॲड. अजित बोराडे, काशिनाथ शिंदे, पोलीस निरीक्षक पाटील साहेब, सामाजिक कार्यकर्ते गोरख गायकवाड, बिल्डर शंकर अण्णा तसेच नवनाथ मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थितांनी, “जिथे गुरूंचे मार्गदर्शन, आई-वडिलांचा सन्मान आणि सरस्वतीचे पूजन होते, तिथेच संस्कारमय समाजाची भक्कम पायाभरणी होते,” असा संदेश देत भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचा समारोप भक्तिमय वातावरणात आणि सर्वांच्या समाधानाने झाला.

See also  रोजगार मेळ्यांतून तरुणांसाठी संधींची दारे खुली : सचिन अहिर
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!