७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शनातून उज्ज्वल भविष्यास नवी दिशा!

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड

शेखर चिंचवडे युवा फाउंडेशनच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आणि करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. ग. दि. माडगूळकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमात सुमारे १५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. ज्ञानेश्वर जाधवर, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच शिक्षण मंडळाचे उपसभापती नाना शिवले यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधत उच्च शिक्षण, करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करण्याबरोबरच त्यांना योग्य दिशा, प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शेखर चिंचवडे युवा फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

See also  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या बोधचिन्हाला स्थायी समितीची मंजुरी; अश्वारूढ शिवरायांसह ‘कटिबद्ध जनहिताय’चा संदेश
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!