डिव्हाईन सॉलिटेयर्सचा देशव्यापी उपक्रम; १०० हून अधिक शहरांतील २०० हून अधिक दागिन्यांच्या दुकानांचा सहभाग
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : डिव्हाईन सॉलिटेयर्सतर्फे आयोजित भारतीय सॉलिटेअर महोत्सव २०२६ ची चिंचवड येथील रांका ज्वेलर्समध्ये बक्षीस वितरण सोहळ्याने उत्साहात सांगता झाली. या महोत्सवाचे बंपर बक्षीस विजेते अमरदीप जिंदे यांना नवीन एक्सयूव्ही ७ एक्सओ कारच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. देशभरातील ग्राहकांना सॉलिटेअर दागिन्यांच्या खरेदीचा विशेष अनुभव देणाऱ्या या महोत्सवाचा समारोप यावेळी करण्यात आला.
सॉलिटेअर हा केवळ दागिन्यांचा प्रकार नसून आयुष्यातील खास क्षण, महत्त्वपूर्ण यश आणि नात्यांमधील आनंद जपण्याचे प्रतीक मानले जाते. याच भावनेतून डिव्हाईन सॉलिटेयर्सने या महोत्सवाचे आयोजन केले होते.
देशभरातील १०० हून अधिक शहरांत आयोजन
भारतीय सॉलिटेअर महोत्सव २०२६ देशातील १०० हून अधिक शहरांमधील २०० हून अधिक भागीदार दागिन्यांच्या दुकानांत आयोजित करण्यात आला होता. या माध्यमातून ग्राहकांना सॉलिटेअर दागिने समजून घेण्याची आणि खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. महोत्सवात निश्चित भेटवस्तू, साप्ताहिक भाग्यवान सोडत आणि राष्ट्रीय स्तरावरील बंपर बक्षीस अशा आकर्षक संधी देण्यात आल्या.
सॉलिटेअरची गुणवत्ता, प्रमाणपत्रे आणि पारदर्शक किंमत निर्धारण यांवर भर देत ग्राहकांना माहितीपूर्ण खरेदीसाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात रांका ज्वेलर्ससारख्या भागीदार विक्रेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ग्राहकांशी नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न
डिव्हाईन सॉलिटेयर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक जिग्नेश मेहता म्हणाले, “ग्राहकांशी जोडले जाण्यासाठी आणि त्यांच्यासाठी आनंददायी अनुभव निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतो. भारतीय सॉलिटेअर महोत्सव हा देशभरातील ग्राहक आणि आमच्या विक्री भागीदारांना एकत्र आणणारा उपक्रम आहे. या महोत्सवाच्या यशस्वी सांगतेनिमित्त आम्हाला साथ देणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. भविष्यातही ग्राहकांसाठी नवनवीन आकर्षक उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
रांका ज्वेलर्स, चिंचवडचे संचालक तेजपाल रांका म्हणाले, “डिव्हाईन सॉलिटेयर्ससोबतचे आमचे दीर्घकालीन संबंध लाभदायक ठरले आहेत. महोत्सवादरम्यान आमच्या दुकानात ग्राहकांची वर्दळ वाढल्याचे दिसून आले. आमच्या दुकानातील ग्राहकाने देशव्यापी महोत्सवाचे बंपर बक्षीस जिंकणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यातही डिव्हाईन सॉलिटेयर्ससोबत असेच उपक्रम राबविण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
गुणवत्ता आणि पारदर्शकतेवर भर
डिव्हाईन सॉलिटेयर्सकडून १२३ निकषांवर आधारित गुणवत्ता हमी, प्रमाणित किमती आणि खरेदीनंतरचे ग्राहक लाभ यांवर भर दिला जात आहे. आगामी धनत्रयोदशी आणि सणासुदीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर विशेष सवलती व आकर्षक उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक ग्राहकांना सॉलिटेअर दागिन्यांकडे आकर्षित करण्याची ब्रँडची योजना आहे.
गुणवत्ता, पारदर्शक किंमत निर्धारण आणि ग्राहकांचा विश्वास या बाबींना प्राधान्य देत भारतीय सॉलिटेअर दागिन्यांच्या बाजारपेठेत आपले स्थान अधिक भक्कम करण्याचा डिव्हाईन सॉलिटेयर्सचा प्रयत्न आहे.







