महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात पुष्पहार अर्पण करून केले स्मरण
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहराचे शिल्पकार आणि माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांना अभिवादन करण्यात आले. महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
या अभिवादन कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य विनोद नढे, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही यावेळी उपस्थित राहून अण्णासाहेब मगर यांना अभिवादन केले.







