महिलांसाठी इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये मोफत तांत्रिक प्रशिक्षण

तिसऱ्या बॅचला १० ऑक्टोबरपासून सुरुवात; ग्रामीण भागातील निवडक पाच प्रशिक्षणार्थींना निवास व भोजनाची मोफत सुविधा

काशिनाथ शिंदे

पिंपरी  पुणे: युवती व महिलांना अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील रोजगाराच्या संधींसाठी आवश्यक तांत्रिक कौशल्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इंजिनिअरिंग क्लस्टर, पुणे यांच्या वतीने महिलांसाठी सहा महिन्यांचे मोफत तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या तिसऱ्या बॅचला १० ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार असल्याची माहिती इंजिनिअरिंग क्लस्टर, पुणेचे संचालक सागर शिंदे यांनी दिली.

ला फाउंडेशन डसॉल्ट सिस्टीम्स, पुणे यांच्या सामाजिक दायित्व निधीच्या सहकार्याने ‘इंडस्ट्रियल एस्पायरा – अॅडव्हान्स सर्टिफिकेशन इन सीएनसी ऑपरेशन, डिझाईन अँड क्वालिटी कंट्रोल’ हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्णतः मोफत असून ग्रामीण भागातील निवडक पाच प्रशिक्षणार्थींना निवास व भोजनाची सुविधाही मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या उद्योगाभिमुख प्रशिक्षणामध्ये सीएनसी प्रोग्रामिंग व ऑपरेशन, डिझाईन, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन प्रक्रिया, व्यक्तिमत्त्व विकास व संवादकौशल्य, प्रत्यक्ष औद्योगिक भेटी, प्रात्यक्षिक प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष उद्योगातील प्रशिक्षण यांचा समावेश आहे.

प्रशिक्षणासाठी किमान बारावी उत्तीर्ण आणि १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवती व महिला अर्ज करू शकतात. सहा महिन्यांचे हे प्रशिक्षण इंजिनिअरिंग क्लस्टर, पुणे, ५३५ जे ब्लॉक, गवळी माथा, एमआयडीसी, भोसरी, पुणे येथे होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे व परिसरातील अभियांत्रिकी आणि उत्पादन उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी नोकरीसाठी मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या पहिल्या दोन बॅचला मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या बॅचचे आयोजन करण्यात आले आहे. तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवती व महिलांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सागर शिंदे यांनी केले आहे.

See also  वाढदिवसाचा अनोखा सामाजिक उपक्रम; लामजेवाडीतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप

प्रवेश व अधिक माहितीसाठी समन्वयक मनीषा मॅडम – ९०२८५८७८७१ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच finance@enggclusterpune.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

  • Related Posts

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    सायंकाळच्या वीजटंचाईवर मात करण्यासाठी महावितरणचा पुढाकार; आगामी उन्हाळ्यात ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा काशिनाथ शिंदे : मुंबई Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज…

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    पुण्यातील १०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्य विकासावर  काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक