अमर घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मरणार्थ उपक्रम
काशिनाथ शिंदे
इंदापूर : वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी येथे राबविण्यात आला. युवा उद्योजक अमर घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लामजेवाडी तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या वेळी सरपंच शंकरराव राऊत, माजी सरपंच राहुल वाबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ धुमाळ, महेश काळे, हरिभाऊ बर्गे, महादेव साळुंखे, अशोक निगडे, लालासो धुमाळ, कुंडलिक शेलार, चैतन्य धुमाळ, अश्विनी शेलार आदी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी सरपंच राहुल वाबळे यांनीही मनोगत व्यक्त करत अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. सामाजिक कार्यकर्ते गोपाळ धुमाळ यांनी आभार मानले







