काशिनाथ शिंदे: पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत वर्षानुवर्षे निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यभावनेने योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिका भक्कमपणे उभी आहे, असे गौरवोद्गार सहआयुक्त मनोज लोणकर यांनी काढले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात सप्टेंबर २०२६ अखेर सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले १९ आणि स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेले २, अशा एकूण २१ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहआयुक्त मनोजलोणकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये उपअभियंता गणेश राऊत, कार्यालय अधीक्षक रमेश यादव, मुख्याध्यापक पुष्पा शिंदे, रजनी आहेर, अनुजा सोनगरे, मुख्य लिपिक रामू गेंगजे, रोहिणी ढेंबरे, सिस्टर इनचार्ज पौर्णिमा आमले, जलधारा टिपले, संगणक परिचालक अरुण गुंडगळ, उपशिक्षक नीलिमा भांबेरे, सुनिता शेजवळ, रखवालदार बाळू लांडगे, लिफ्टमन विलास गायकवाड, मजूर हंसराज सजनियाल, लक्ष्मण मानमोडे, पांडुरंग गवारी, सफाई कामगार सविता काळभोर आणि नंदकुमार भोंडवे यांचा समावेश आहे.
तर सफाई कामगार राजेश गंगावणे आणि कचरा कुली गणेश यादव यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.
या वेळी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ सेवेला उजाळा देत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सेवाकाळातील अनुभव आणि कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य लिपिक माया वाकडे, नंदकुमार इंदलकर यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.







