प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांची बैठक; वाहतूक प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा

 पिंपरी चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या पदाधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन   अधिकारी संदेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांची बैठक; वाहतूक प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

काशिनाथ शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालक व पदाधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी परिवहन विभागाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रादेशिक  परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधत वाहतूक व्यवस्था, चालक प्रशिक्षण तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूलसमोरील विविध अडचणींबाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी अनंत कुंभार, स्वप्निल पवार,  पिंपरी चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे अध्यक्ष श्री. शरदराव घारे  , सचिव सुनील होले , रोशन मिस्त्री, दिनेश तट्टू , अभिजित शिंदे, बापूसाहेब देशमुख, राजेंद्र भारंबे  शुभम गाडगे  विनोद जाधव, राष्ट्रवादी वाहतूक विभागाचे कार्याध्यक्ष अकबर शेख, विनोद वरखडे (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी वाहतूक) तसेच वेदांत ड्रायव्हिंगचे संचालक उपस्थित होते.

बैठकीदरम्यान मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून वाहनचालकांना दिले जाणारे प्रशिक्षण, परवाना प्रक्रियेतील अडचणी, प्रशिक्षणाची गुणवत्ता, वाहतूक नियमांचे पालन तसेच चालकांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

 प्रादेशिक परिवहन  अधिकारी संदेश चव्हाण यांनी मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करून वाहनचालकांना योग्य व सुरक्षित प्रशिक्षण देण्याचे आवाहन केले. प्रशिक्षण प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त राखण्याबरोबरच रस्ते सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रतिनिधींनीही आपल्या विविध अडचणी व मागण्या प्रादेशिक विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या. या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन संबंधित बाबींवर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

प्रादेशिक परिवहन  अधिकारी   संदेश चव्हाण  पिंपरी चिंचवड व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  राहुल जाधव  पिंपरी चिंचवड

 

See also  म्युल अकाउंटच्या आंतरराज्य टोळीचा वानवडी पोलिसांकडून पर्दाफाश

या बैठकीमुळे प्रादेशिक  परिवहन विभाग आणि मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून, शहरातील वाहनचालक प्रशिक्षण व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

  • Related Posts

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    पुण्यातील १०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्य विकासावर  काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी.…

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक