दहा दिवसांच्या सीसीटीव्ही तपासानंतर ‘युनिट-३’चा दणका; चेन स्नॅचिंगसह वाहनचोरीचे दोन गुन्हे उघड

एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील तीन आरोपी ताब्यात; सोन्याचे मंगळसूत्र व होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल जप्त

काशिनाथ शिंदे

पिंपरी चिंचवड : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा तपास करताना तब्बल दहा दिवस १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने रेकॉर्डवरील आरोपींचा माग काढला. आरोपी व त्यांच्या साथीदारांकडून चेन स्नॅचिंग तसेच वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणत मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलिस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोहाडे, अजित रूपनवर, बाळासाहेब भांगले, सुंदर थोरात, तुषार वराडे, दिलीप राठोड, स्वप्निल महाले, शशिकांत नांगरे आणि सचिन गोनटे यांनी ही कारवाई केली.

गोपनीय माहितीने आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान पोलिस उपनिरीक्षक सुनिल जावळे व पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार आदर्शनगर, मोशी, पुणे परिसरात शोध घेतला असता तीन संशयित इसम आढळून आले.

त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे १) इंदर अनिल राजपूत (वय २२), व्यवसाय मजुरी, रा. आदर्शनगर, मोशी, पुणे; २) महेश कान्हा राजपूत (वय २६), व्यवसाय मजुरी, रा. मोहननगर, गोडावून चौक, मोशी, पुणे; आणि ३) एक विधिसंघर्षित आरोपी अशी निष्पन्न झाली.

सखोल तपासात आरोपींनी सेक्टर ८, प्राधिकरण, मोशी येथून रात्रीच्या वेळी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याचे सांगितले. तसेच मु.पो. कोळविहिरे, ता. पुरंदर, जि. पुणे येथून होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

दोन गुन्हे उघड; सोन्याचे मंगळसूत्र आणि दुचाकी जप्त

See also  "विकासनगरात विठ्ठलनामाचा गजर; ज्येष्ठ नागरिकांच्या पालखी सोहळ्याने परिसर झाला भक्तिमय!"

या कारवाईत पुढील गुन्हे उघडकीस आले आहेत—

एमआयडीसी भोसरी पोलिस ठाणे गु.र.जि.नं. ६३२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५).

जेजुरी पोलिस ठाणे गु.र.नं. २८४/२०२६, भारतीय न्याय संहितेचे कलम ३०३(२).

पोलिसांच्या तपासात आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध दिघी, एमआयडीसी भोसरी, चाकण आणि वाकड पोलिस ठाण्यांत विविध कलमांन्वये गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे डॉ. सुदर्शन राठोड यांच्या आदेश व सूचनांनुसार करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-३च्या पथकाने कारवाई केली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जोनापल्ले करीत आहेत.

  • Related Posts

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    एसबीपीआयएममध्ये ‘आरंभ’ कार्यक्रमांतर्गत चर्चासत्र संपन्न काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : “मानव संसाधन आणि मनुष्यबळ विकास हे क्षेत्र लोक आणि संस्कृतीशी संबंधित आहे. मानव संसाधन म्हणजे…

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी गरजूंना द्या; महापालिका आणि स्वच्छ संस्थेचा संयुक्त उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत होणाऱ्या साफसफाईत वापरात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी