दहा दिवसांत पुणे जिल्ह्यात ६,५८६ आरोग्य शिबिरे; ३ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी!

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य जनजागृतीला वेग

काशिनाथ शिंदे

पुणे  : गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अवघ्या दहा दिवसांत जिल्ह्यात तब्बल ६,५८६ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरांमध्ये ३,०१,८४३ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पुणे जिल्ह्यात या उपक्रमाचे प्रभावी नियोजन व समन्वय डॉ. मानसिंग साबळे यांनी केला.

विविध शासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक गणेश मंडळे, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

घराजवळच मिळाली आरोग्य तपासणीची सुविधा

पुणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भाग, नगरपालिका, नगरपंचायती तसेच विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्यामुळे गणेशोत्सवासाठी घराबाहेर पडलेल्या भाविकांना आपल्या परिसरातच प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली.

या शिबिरांमध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, हृदयविकार, ईसीजी, विविध रक्त तपासण्या, किडनीविकार, कर्करोग, दंतरोग, संसर्गजन्य आजार, फिजिओथेरपी, आयुर्वेद उपचार, बालरोग यांसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. तसेच आयुष्मान भारत कार्ड नोंदणी आणि अवयवदान नोंदणी याबाबतही नागरिकांना सुविधा व मार्गदर्शन देण्यात आले.

महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवरही विशेष लक्ष देण्यात आले. स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.

गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भ

आरोग्य तपासणीदरम्यान काही समस्या आढळलेल्या नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर तसेच संबंधित शासकीय, निमशासकीय आणि धर्मादाय रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात आले.

See also  ५१व्या वर्षात सुवर्ण मित्र मंडळाचा दिमाखदार गणेशोत्सव!

पात्र रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय योजना तसेच इतर शासकीय आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

व्यापक जनसहभागातून उपक्रमाला बळ

उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, शासकीय व धर्मादाय रुग्णालये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.

गणेशोत्सवासारख्या मोठ्या लोकसहभागाच्या उत्सवाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, आजारांचे प्राथमिक निदान आणि आरोग्य जनजागृती करण्याचा उद्देश या उपक्रमातून साध्य करण्यात आला.

रामेश्वर नाईक म्हणाले…

“मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्यात आला. पुणे जिल्ह्यातील विविध यंत्रणा, गणेश मंडळे, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून ६ हजारांहून अधिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी योग्य ठिकाणी संदर्भित करणे, यावर विशेष भर देण्यात आला.”

— श्री. रामेश्वर नाईक

कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महाराष्ट्र राज्य

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ — उत्सवातून आरोग्याकडे, आरोग्यातून निरोगी समाजाकडे!

 

  • Related Posts

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल…

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; १७ दुचाकींसह चारचाकी वाहनांचे नुकसान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश