‘संवेदनशील, कुशल अभियंता’ अशी स्वतःची ओळख निर्माण करा

पीसीसीओईआरमध्ये प्रथम वर्षाच्या बी.टेक. विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

काशिनाथ शिंदे पिंपरी

अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साध्य करतानाच समाजाप्रती जबाबदार, संवेदनशील आणि कुशल अभियंता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नवकल्पना आणि उद्योग क्षेत्राशी संपर्काच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल करिअर घडवावे, असे मार्गदर्शन पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे मेकॅनिकल, सिव्हिल, ई अँड टीसी आणि आयटी या शाखांच्या प्रथम वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. तिवारी मार्गदर्शन करत होते.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे असोसिएट डीन डॉ. राहुल मापारी, पीसीईटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीन डॉ. शितलकुमार रवंदळे, विभाग प्रमुख प्रा. शीतल पाटील, इंडक्शन कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. प्रिया ओघे, पालक प्रतिनिधी अशोक अरळी, विविध विभागांचे प्रमुख व प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात शिस्त, नैतिक मूल्ये आणि सातत्य यांचा अंगीकार करून ज्ञानार्जन करावे, नवकल्पनांना प्रोत्साहन द्यावे आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून करिअर घडवावे, असे आवाहन केले. तंत्रज्ञानाच्या विकासाचा आणि बदलाचा वेग मोठा असल्याने उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या अभियंत्यांकडून अपेक्षाही वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींचा योग्य लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

पालक प्रतिनिधी अशोक अरळी यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रमांचे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध संधींबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी मेकॅनिकल, सिव्हिल, ई अँड टीसी आणि आयटी या शाखांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

See also  मातंग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण; २३ ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे स्वागत प्रा. प्रिया ओघे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. शीतल पाटील यांनी केले.

  • Related Posts

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    ५ कामांच्या करारासाठी लाचेची मागणी; १९ हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंता प्रमोद…

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न