मातंग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण; २३ ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी

काशिनाथ शिंदे : मुंबई

महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबईच्या वतीने मातंग व तत्सम जातींमधील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, पोलीस व सैन्य भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांचे नि:शुल्क पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.

यूपीएससी, एमपीएससी, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (एमईएस), न्यायिक सेवा (जेएमएफसी), एसएससी, आयबीपीएस, रेल्वे, एलआयसी, नाबार्ड तसेच पोलीस व सैन्य भरतीसाठी ६ ते ११ महिन्यांचे अनिवासी प्रशिक्षण दिल्ली आणि महाराष्ट्रातील नामांकित खासगी प्रशिक्षण संस्थांमार्फत दिले जाणार आहे.

प्रशिक्षण काळात विद्यार्थ्यांना दरमहा १० हजार ते १३ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार असून, पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी १३ हजार ते १८ हजार रुपयांचे एकरकमी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारुडी, मादगी आणि मादिगा या समाजातील पदवीधर उमेदवार या योजनेसाठी पात्र आहेत. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेऊन गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्जाची अंतिम मुदत २३ ऑगस्ट २०२६ असून, अर्ज प्रक्रिया ९ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी articet2026.cbtexam.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या सर्वंकष धोरणानुसार राज्यातील विविध संशोधन व प्रशिक्षण संस्थांच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांचे संनियंत्रण व अंमलबजावणी टीआरटीआय संस्थेमार्फत केली जाणार असल्याचे सुनील वारे यांनी सांगितले.

See also  कामगाराच्या मृत्यूप्रकरणी अभियंता-ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!