पुणे महापालिकेत नोकरीचे आमिष; १५ लाखांची फसवणूक, बनावट नियुक्तीपत्रे देणाऱ्यावर गुन्हा

काशिनाथ शिंदे :पुणे

पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता आणि उपआयुक्त पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून तब्बल १५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. नोकरी न देता बनावट नियुक्तीपत्रे, बदली आदेश आणि ओळखपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शिवानंद बाळासाहेब पाटील (वय ४५, रा. आनंद कॉलनी, कर्वेनगर) याच्याविरुद्ध पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी निलेश हनुमंत शिंदे (वय ३५, रा. धायरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(४), ३१६(२), ३१६(५), ३३६(२), ३३६(३), ३३८ आणि ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर २०२३ पासून हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पाटील याने आपण पुणे महानगरपालिकेत क्रीडा अधीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे तसेच मंत्रालयात आपली चांगली ओळख असल्याचे सांगून शिंदे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महापालिकेत विविध पदांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले.

रक्कम घेतल्यानंतर आरोपीने पुणे महानगरपालिकेच्या नावाने स्वाक्षरी असलेली बनावट नियुक्तीपत्रे, बदली आदेश तसेच बनावट ओळखपत्र शिंदे यांना दिले. मात्र प्रत्यक्षात त्यांना कोणतीही नोकरी मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी पर्वती पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

विशेष म्हणजे, पाटील हा पुणे महानगरपालिकेत शिपाई म्हणून कार्यरत असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पर्वती पोलिस करीत आहेत.

See also  ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!