‘आझाद मैदान’च्या रणशिंगाला सरकारचा प्रतिसाद!; शिक्षकांच्या टप्पा वाढीवर तातडीची बैठक घेण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

काशिनाथ शिंदे : मुंबई

मुंबई / पंढरपूर : राज्यभरातील शिक्षकांनी आझाद मैदानावर उभारलेल्या टप्पा वाढ आंदोलनाचा आवाज अखेर मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे. आंदोलनातील मागण्यांची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिल्याने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीला वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आझाद मैदानावरील आंदोलनावेळी शिक्षकांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेऊन पुढील कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे तसेच लेखी पत्राद्वारे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांच्या टप्पा वाढीसाठी राज्यभरातील शिक्षकांनी मोठे आंदोलन छेडले होते. आंदोलनाच्या समारोपावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी एका महिन्याच्या आत मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही बैठक न झाल्याने शिक्षकांमध्ये नाराजी होती.

दरम्यान, पंढरपूर येथे **’एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना’**च्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे मार्गदर्शक मंगेश चिवटे, प्रदेशाध्यक्ष डॉ. बापूसाहेब अडसूळ आणि प्रदेश सहसचिव उमेश कल्याणी उपस्थित होते. निवेदन स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून बैठक लवकरात लवकर आयोजित करण्याचे निर्देश दिले.

शिक्षकांच्या टप्पा वाढीच्या प्रश्नासाठी मंगेश चिवटे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या तातडीच्या भूमिकेमुळे मंत्रालयात लवकरच उच्चस्तरीय बैठक पार पडण्याची शक्यता असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या टप्पा वाढीच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा राज्यभरातील शिक्षक व्यक्त करत आहेत.

See also  ससूनच्या इमर्जन्सीत सिक्युरिटीची दादागिरी? रुग्णांच्या नातेवाईकांकडून गंभीर तक्रारी; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!