कुंभमेळा घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार; ५९१ कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात तिघांना अटक

काशिनाथ शिंदे : नाशिक

कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली तब्बल ५९१ कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून या वर्क ऑर्डर काढण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

या कारवाईत जळगाव जिल्ह्यातील तनय अनंत महाजन आणि नरेंद्र महाजन यांच्यासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आतापर्यंत ५९१ कोटी रुपयांच्या पाच बनावट वर्क ऑर्डर समोर आल्या आहेत. या कागदपत्रांमध्ये विभागीय आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणामुळे कुंभमेळ्याच्या कामांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रयत्न झाला का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. नाशिक रोड पोलिसांकडून अटक आरोपींची चौकशी सुरू असून या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे नाशिक आणि जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, तपासातून पुढे काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

See also  पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!