पीसीयूमधील उच्च तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून कौशल्य सिद्ध करावे

हर्षवर्धन पाटील; पीसीयू येथे ‘इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन

 

काशिनाथ शिंदे

पिंपरी, पुणे : भविष्यातील तंत्रज्ञानाशी समन्वय साधणाऱ्या ‘इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स’ या अत्याधुनिक सुविधा पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयू) परिसरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या उच्च तंत्रज्ञान सुविधांचा पुरेपूर उपयोग करून आपल्या कौशल्याची क्षमता सिद्ध करावी, असे आवाहन पीसीयूचे कुलपती व पीसीइटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पीसीयू कॅम्पसमध्ये ‘इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन पीसीयूचे कुलपती व पीसीइटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील आणि ज्येष्ठ उद्योजक पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, आयटी आणि आयटीईएस प्रमुख डॉ. रामकृष्ण वडाली, पीसीयू-फोर्ब्स मार्शल प्रमुख राजेश पाटील, डिजिटेक रोबोटिक इंडिया प्रा. लि.चे सीईओ व संस्थापक अजित गटे, तसेच लि. आम आणि गजानन पाटील आदी उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, “या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना नवोन्मेषाचे प्रत्यक्ष प्रयोग करण्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. हा प्रकल्प विद्यार्थ्यांमधील संशोधनाची वृत्ती आणि उद्योजकतेला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल.”

पद्मश्री प्रतापराव पवार म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, स्वयंचलन, अर्धसंवाहक आणि विद्युत वाहन तंत्रज्ञान यांसारखी क्षेत्रे भविष्यातील उद्योगविश्वात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था आणि विद्यापीठ यांच्यातील सहकार्यामुळे शिक्षण अधिक परिणामकारक होण्याबरोबरच रोजगाराच्या संधींनाही चालना मिळेल. पीसीयूने भविष्यातील गरजा ओळखून सुरू केलेले हे केंद्र विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल.

See also  टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

पीसीयू व टाटा मोटर्स डिप्लोमा प्रमुख डॉ. उमेश पोतदार यांनी सांगितले की, या केंद्राचा उपयोग पीसीयू-टाटा मोटर्सच्या मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी तसेच केनिया आणि झांझिबार येथील विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित कौशल्य विकास कार्यक्रमासाठी होणार आहे.

पीसीयूचे आयटी आणि आयटीईएस प्रमुख डॉ. रामकृष्ण वडाली यांनी सांगितले की, सी-डॅक पुणे, डिजिटेक रोबोटिक इंडिया प्रा. लि. आणि एएमडी यांच्या सहकार्याने उच्च क्षमतेच्या १६ प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. या प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांसह संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांनाही प्रशिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या केंद्रामध्ये औद्योगिक स्वयंचलन, औद्योगिक मेकॅट्रॉनिक्स, औद्योगिक रोबोटिक्स, स्मार्ट फॅक्टरी स्वयंचलन व आयआयओटी, डिजिटल ट्विन, कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स, मशीन लर्निंग, विद्युत वाहन तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, अर्धसंवाहक तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल डिझाइन, प्रगत एम्बेडेड आयओटी व एआयओटी, औद्योगिक संगणक एकात्मिक उत्पादन, उच्च कार्यक्षमता संगणन, कृत्रिम बुद्धिमत्ता व अॅडॅप्टिव्ह कॉम्प्युटिंग तसेच संशोधन व विकास प्रयोगशाळा अशा विविध अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.

  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर