पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली; महापालिका तिजोरीत ६१० कोटी जमा!

६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर; वाकड विभागाची सर्वाधिक ८४ कोटी ९१ लाखांची वसुली

काशिनाथ शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या सहामाहीत तब्बल ६१० कोटी ४४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. शहरातील ७ लाख ६६ हजार नोंदणीकृत मालमत्ता धारकांपैकी ५ लाख ९ हजार २०० म्हणजेच ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे.

महापालिकेच्या वतीने कर भरण्यासाठी विविध सवलती, जनजागृती मोहीम, जप्ती कारवाई, थकबाकीदारांना नोटिसा, वृत्तपत्रांमध्ये थकबाकीदारांच्या नावांची प्रसिद्धी, महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाद्वारे जनजागृती तसेच मालमत्ता कराची रक्कम आणि उपलब्ध सवलतींची माहिती देणारे संदेश नागरिकांना पाठविण्यात आले. या विविध उपाययोजनांमुळे कर भरणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

गतवर्षी सप्टेंबरअखेर ४ लाख ७८ हजार २६८ मालमत्ता धारकांनी ६०३ कोटी ८२ लाख रुपयांचा कर भरला होता. यंदा सहा महिन्यांतच ५ लाख ९ हजार २०० मालमत्ता धारकांनी कर भरून ६१० कोटी ४४ लाख रुपये महापालिका तिजोरीत जमा केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ६ कोटी ६२ लाख रुपयांची अधिक वसुली झाली असल्याचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांची पसंती

महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन कर भरणा सुविधेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ४ लाख ४५ हजार मालमत्ता धारकांनी ऑनलाइन पद्धतीने ४७१ कोटी ८३ लाख रुपयांचा कर भरला आहे. त्यामुळे घरबसल्या कर भरण्याच्या सुविधेला नागरिकांनी पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाकड विभागाची सर्वाधिक वसुली

महापालिकेच्या १८ करसंकलन विभागीय कार्यालयांमध्ये वाकड कार्यालयाने सर्वाधिक ८४ कोटी ९१ लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. त्यापाठोपाठ थेरगाव ५३ कोटी १५ लाख, कस्पटे वस्ती ४५ कोटी १९ लाख, किवळे ४४ कोटी ९१ लाख, पिंपरी नगर ४४ कोटी ९९ लाख आणि चिखली ४४ कोटी ६१ लाख रुपयांची वसुली झाली आहे. तळवडे कार्यालयाने ११ कोटी ९९ लाख रुपयांचा कर वसूल केला आहे.

See also  बनावट खात्यांचा काळाबाजार उघड! ६९ नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक; आळंदी पोलिसांचा मोठा दणका

चार वर्षांतील सहामाही वसुली

२०२३-२४ : ५९० कोटी ६० लाख

२०२४-२५ : ५१२ कोटी ६२ लाख

२०२५-२६ : ६०३ कोटी ८२ लाख

२०२६-२७ : ६१० कोटी ४४ लाख

निवासी मालमत्ता धारक आघाडीवर

कर भरणाऱ्यांमध्ये निवासी मालमत्ता धारकांची संख्या सर्वाधिक आहे. निवासी ४ लाख ५१ हजार ७३९, बिगरनिवासी ४० हजार १९७, मिश्र १० हजार ४४, औद्योगिक ३ हजार ६६७ आणि मोकळ्या जमिनीच्या ३ हजार ४८९ मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे.

थकबाकी वसुलीला प्राधान्य

महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी म्हणाले, मालमत्ता कर हा महापालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या सहामाहीत ६१० कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. कर भरून शहर विकासात योगदान देणाऱ्या नागरिकांचे आभार मानत, पुढील काळात थकबाकीदार मालमत्तांकडून कर वसुलीला प्राधान्य दिले जाणार आहे.

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले की, १८ करसंकलन विभागीय कार्यालयांचे उद्दिष्टनिहाय नियोजन करण्यात आले. कार्यालयनिहाय प्रगती, थकबाकीदार मालमत्ता आणि वसुलीच्या स्थितीचा नियमित आढावा घेण्यात आला. त्यामुळे आतापर्यंतची सर्वाधिक कर वसुली करण्यात यश आले.

उपायुक्त सचिन पवार म्हणाले की, करदात्यांना सवलतींचा लाभ घेता यावा आणि कर भरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात आली. परिणामी सहा महिन्यांत ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी कर भरला आहे. पुढील सहा महिन्यांत उर्वरित मालमत्ता धारकांकडून कर संकलनावर लक्ष केंद्रित करून अनेक वर्षांपासून थकीत असलेला कर आणि चालू कराची १०० टक्के वसुली करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

  • Related Posts

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; १७ दुचाकींसह चारचाकी वाहनांचे नुकसान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी…

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    २५ लाखांपर्यंतच्या कामांना अतिरिक्त आयुक्तांची मान्यता; त्यापुढील प्रस्तावांसाठी स्थायी समितीची पूर्वपरवानगी आवश्यक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रात प्रभागस्तरावरील स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर