मोलकरणीने देवीच्या दागिन्यांवर मारला डल्ला; 2.84 लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड : गौरी-गणपतीच्या सजावटीदरम्यान घरातून चोरीला गेलेले तब्बल 30.546 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल, शिरगाव-परंदवडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत हस्तगत केले. या सोन्याच्या दागिन्यांची किंमत 2 लाख 84 हजार 847 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी 26 सप्टेंबर रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार प्राप्त होताच शिरगाव-परंदवडी पोलिसांनी तपास सुरू केला. घरातील व्यक्ती तसेच ये-जा करणाऱ्या व्यक्तींची माहिती घेत असताना घरात काम करणाऱ्या मोलकरीण महिलेवर पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी संशयित महिलेची चौकशी केली असता तिच्याकडून चोरीला गेलेला सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी 30.546 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र पेंडलसह जप्त केले असून त्याची बाजारातील किंमत 2 लाख 84 हजार 847 रुपये असल्याचे सांगण्यात आले.

गौरी-गणपतीच्या सणानिमित्त घरात देवीची सजावट करण्यात आली होती. याच कालावधीत घरातील सोन्याचा दागिना चोरीला गेल्याने कुटुंबीयांना धक्का बसला होता. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने तपास करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.

या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरगाव-परंदवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

See also  डोंगरदरी हटली, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक पुन्हा वाहतुकीसाठी खुली!
  • Related Posts

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल…

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; १७ दुचाकींसह चारचाकी वाहनांचे नुकसान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश