काशिनाथ शिंदे
कासारवाडी : हॉटेल कलासागर येथे भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कोअर समितीची महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शहरातील संघटनात्मक आढावा, आगामी पक्षीय नियोजन आणि पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे कार्य तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, बूथ पातळीवरील संघटन अधिक सक्षम करणे तसेच आगामी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंधपणे काम करण्याबाबत मार्गदर्शन केले.
बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातील विविध राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक विषयांवर कोअर समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये सखोल चर्चा झाली. आगामी काळातील पक्षाचे उपक्रम, संघटन विस्तार आणि नियोजन याबाबतही विचारमंथन करण्यात आले.
बैठकीला जिल्हा प्रभारी भरत पाटील, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, माजी खासदार अमरजी साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, महापौर रवी लांडगे, सदाशिवराव खाडे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस वैशाली खाडये, सरचिटणीस मधुकर बच्चे आणि सरचिटणीस विकास डोळस यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.






