विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा शनिवारी भव्य नागरी सत्कार

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते गौरव; महापौर रवी लांडगे अध्यक्षस्थानी

काशिनाथ शिंदे

पिंपरी पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल शनिवारी (दि. ३ ऑक्टोबर) त्यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा सत्कार होणार असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

काळेवाडी-विजयनगर, पिंपरी येथील हॉटेल रागा पॅलेस येथे (मदर टेरेसा उड्डाणपुलालगत) सकाळी ११ वाजता हा सोहळा होणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, पालकमंत्री भरतशेठ गोगावले, खासदार पार्थ पवार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेशदादा लांडगे, शंकर जगताप, गोपीचंद पडळकर, उमाताई खापरे, शंकर मांडेकर, बापू पठारे, सुनील कांबळे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, सुनील टिंगरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक वारसा पुढे नेणारी संस्था

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि ऐतिहासिक वारशाचा ठेवा पुढे नेणारी ही महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था आहे. अशा ऐतिहासिक संस्थेच्या शासकीय नियामक मंडळावर अण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती होणे ही पिंपरी चिंचवड शहरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

नगरसेवक ते विधानसभा उपाध्यक्ष; राजकीय प्रवास प्रेरणादायी

अण्णासाहेब बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरात कार्यकर्ता म्हणून सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात केली. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, पिंपरी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे.

See also  माथाडी कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश; ४४३ कामगारांनी स्वीकारले पक्षाचे सदस्यत्व

पीपल्स एज्युकेशन सोसायटीसारख्या ऐतिहासिक संस्थेच्या शासकीय नियामक मंडळावर अण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती करून सरकारने त्यांचा तसेच पिंपरी चिंचवड शहराचा सन्मान केला असल्याची भावना शहरवासीयांमध्ये असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या नियुक्तीमुळे शहरात आनंदाचे वातावरण असून, हा आनंद द्विगुणित करण्यासाठी शनिवारी होणाऱ्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यास हजारो नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आयोजक : महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे गौरव समिती, पिंपरी चिंचवड शहर

सहआयोजक : नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे युवा मंच, पिंपरी चिंचवड शहर

समितीचे पदाधिकारी सुरेश निकाळजे, अंजना गायकवाड, गोपाळ मोरे, निलेश निकाळजे, प्रमोद क्षीरसागर, गंगाताई धेंडे, नितीन ओव्हाळ, संदीप पिसाळ आणि राहुल सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.

  • Related Posts

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; १७ दुचाकींसह चारचाकी वाहनांचे नुकसान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी…

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    २५ लाखांपर्यंतच्या कामांना अतिरिक्त आयुक्तांची मान्यता; त्यापुढील प्रस्तावांसाठी स्थायी समितीची पूर्वपरवानगी आवश्यक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रात प्रभागस्तरावरील स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर