पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवडमधील ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील कामगारांचा ; संजय निकम, आझम खान, ज्ञानेश्वर लांडगे यांच्या पुढाकाराने सोहळा
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड परिसरातील ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील ४४३ माथाडी कामगारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार महेश लांडगे यांच्या सल्ल्यानुसार हा प्रवेश सोहळा पार पडला.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय निकम, पुणे जिल्हाध्यक्ष आझम खान, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे तसेच इंदास पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कामगारांचा पक्षप्रवेश झाला.
ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील माथाडी कामगारांनी एकत्रितपणे संघटनेच्या माध्यमातून काम करावे, यासाठी संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, माथाडी कामगारांचे ज्येष्ठ नेते वाठारकर मामा, इंदास पाटील आणि पांडुरंग काळोखे यांनी प्रयत्न केल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी परिसरातील ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील अनेक माथाडी कामगार संघटनेत सहभागी झाले होते. मात्र, काही टोळ्यांच्या कामाशी संबंधित अडचणी तसेच विविध प्रलंबित प्रश्नांमुळे ४४३ कामगारांचा प्रवेश त्यावेळी झाला नव्हता. संबंधित कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर संबंधित प्रश्न मार्गी लागल्याने या कामगारांनी भाजपमध्ये प्रवेश करून संघटनेचे सदस्यत्व स्वीकारल्याचे संजय निकम यांनी सांगितले.
कामगारांचे वेतन, नियमित कामाची उपलब्धता, माथाडी मंडळातील नोंदणी तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ यासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ४४३ कामगारांच्या सहभागामुळे कामगारांच्या प्रश्नांसाठी संबंधित कंपन्या, माथाडी मंडळे आणि शासनाकडे सामूहिकपणे पाठपुरावा करण्यास संघटनेला बळ मिळाल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
दरम्यान, मातोश्री पतसंस्थेचे चेअरमन तथा ट्रान्सपोर्ट नगर विभागप्रमुख पांडुरंग कदम, रायरेश्वर माथाडी कामगार पतसंस्थेचे चेअरमन सतीश कंठाळे आणि व्हाइस चेअरमन श्रीकांत मोरे यांच्यासह दोन्ही पतसंस्थांच्या संचालक मंडळातील सदस्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती संघटनेने दिली. त्यामुळे माथाडी कामगारांसोबतच संबंधित सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश झाल्याचे सांगण्यात आले.
प्रवेश सोहळ्यास संजय निकम, जयराज रणवरे, बाळासाहेब शिंदे, वाठारकर मामा, आझम खान, ज्ञानेश्वर लांडगे, विनोद पासुटेकर, अजय थोरात, तानाजी सातपुते, अमोल मदणे, महेश सोंडकर, कृष्णा कदम, मारुती घोलप, पांडुरंग काळोखे, पांडुरंग कदम, आब्बास चाऊस यांच्यासह अन्य पदाधिकारी व माथाडी कामगार उपस्थित होते.
तसेच सतीशकंठाळे,श्रीकांतमोरे,अशोकसाळुंखे,उद्धवसरोदे,आदिनाथभिलारे,बालाजीसरोदे,गणेशशिंदे,पिंजन,जोगिंदरशर्मा,बबनतुपे,गायकवाड यांच्यासह संबंधित टोळ्यांतील माथाडी कामगार उपस्थित होते.







