वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका!

५ लाख ७२ हजार कारवायांत तब्बल ६३ कोटी ७८ लाखांचा दंड

विनाहेल्मेट वाहनचालकांवर ७२ हजारांहून अधिक कारवाया; फॅन्सी नंबर प्लेट, काळी काच अन् मॉडिफाइड सायलेन्सरवरही कारवाई

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने धडक कारवाई सुरू ठेवली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली २०२६ मध्ये आजअखेर तब्बल ५ लाख ७२ हजार १८ कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईतून ६३ कोटी ७८ लाख ४७ हजार ६५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये वाहतूक नियमभंगाच्या विविध प्रकारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. विनाहेल्मेटवाहनचालविल्याप्रकरणी७२हजार१२३,फॅन्सीनंबरप्लेटप्रकरणी५३हजार ८४०, काळी काच लावल्याप्रकरणी २७ हजार ५९७, मॉडिफाइड सायलेन्सरप्रकरणी १० हजार २०३, तर वाहन परवाना निलंबनासंबंधी ६ हजार ८७६ कारवाया करण्यात आल्या आहेत.

आमदार, विधानसभा सदस्यांचे लोगो वापरणाऱ्यांवरही कारवाई

मागील आठवड्यात वाहनांवर विधानसभा सदस्य, आमदार तसेच अशोकस्तंभाचा लोगो अनधिकृतपणे वापरणाऱ्या वाहनमालक व चालकांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. संबंधित वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित करण्याबाबतचे प्रस्तावही नियमानुसार पाठविण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.

वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून दंडात्मक तसेच न्यायालयीन कारवाई टाळावी, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. वाहतूक कोंडी, वाहतूक नियमन किंवा इतर वाहतूकविषयक समस्या कळविण्यासाठी ‘ट्रॅफिक बडी’ व्हॉट्सॲप संवाद यंत्रणा क्रमांक ८७८८६४९८८५ याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

— विक्रांत देशमुख, पोलीस उपआयुक्त, वाहतूक, पिंपरी-चिंचवड

See also  वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा; नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप यांची मागणी
  • Related Posts

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी गरजूंना द्या; महापालिका आणि स्वच्छ संस्थेचा संयुक्त उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत होणाऱ्या साफसफाईत वापरात…

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    सायंकाळच्या वीजटंचाईवर मात करण्यासाठी महावितरणचा पुढाकार; आगामी उन्हाळ्यात ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा काशिनाथ शिंदे : मुंबई Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!