वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा; नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप यांची मागणी

आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

काशिनाथ शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) औषध वितरण केंद्रात डॉक्टरांनी लिहून दिलेली आवश्यक औषधे उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे रुग्णांना बाहेरील खासगी औषध विक्रेत्यांकडून महागड्या दराने औषधे खरेदी करावी लागत असल्याचा आरोप करत, वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करून रुग्णांना आवश्यक औषधे विनामूल्य उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी भाजपचे नगरसेवक ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप यांनी केली आहे.

याबाबत जगताप यांनी मंगळवारी (दि. २२) महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि वायसीएमचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांना निवेदन दिले. वायसीएममध्ये पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या परिसरातील हजारो सर्वसामान्य, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, डॉक्टरांनी लिहून दिलेली अनेक औषधे रुग्णालयाच्या औषध वितरण केंद्रात उपलब्ध नसल्याने रुग्णांना ती बाहेरून खरेदी करावी लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे उपचारांमध्ये खंड पडण्याची तसेच रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. औषधांच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये किंवा त्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जगताप यांनी केली.

महापालिकेकडून आरोग्यसेवेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली जात असतानाही अत्यावश्यक औषधे उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. औषध सूचीतील औषधे डॉक्टरांनी लिहून दिल्यानंतरही ती वितरण केंद्रात मिळत नसतील, तर औषधांची खरेदी, साठवणूक आणि वितरण व्यवस्थेची तातडीने चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

औषधसाठ्याची तातडीने तपासणी करण्याची मागणी

वायसीएम रुग्णालयातील उपलब्ध आणि अनुपलब्ध औषधसाठ्याची तातडीने तपासणी करावी. दैनंदिन उपचारांसाठी आवश्यक औषधांची आपत्कालीन पद्धतीने खरेदी करून ती रुग्णांना रुग्णालयातूनच विनामूल्य उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

See also  ५१व्या वर्षात सुवर्ण मित्र मंडळाचा दिमाखदार गणेशोत्सव!

मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, बालरोग तसेच अन्य गंभीर आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा कायम ठेवावा. औषध वितरण केंद्राबाहेर उपलब्ध आणि अनुपलब्ध औषधांची अद्ययावत यादी दररोज प्रसिद्ध करावी. औषधांच्या कमतरतेस जबाबदार अधिकारी, पुरवठादार अथवा कंत्राटदार यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जगताप यांनी केली.

स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याची मागणी

औषधांबाबत रुग्णांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी वायसीएममध्ये स्वतंत्र मदत व तक्रार निवारण कक्ष सुरू करावा. औषध खरेदी आणि वितरण व्यवस्थेवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल सात दिवसांच्या आत द्यावा, अशी मागणी जगताप यांनी केली आहे. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल न घेतल्यास रुग्ण आणि नागरिकांच्या हितासाठी संबंधित वरिष्ठ विभाग तसेच राज्य शासनाकडे तक्रार करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

  • Related Posts

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी गरजूंना द्या; महापालिका आणि स्वच्छ संस्थेचा संयुक्त उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत होणाऱ्या साफसफाईत वापरात…

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    सायंकाळच्या वीजटंचाईवर मात करण्यासाठी महावितरणचा पुढाकार; आगामी उन्हाळ्यात ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा काशिनाथ शिंदे : मुंबई Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!