महावितरणच्या सेवा आता तालुक्यातच; ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियानाला सुरुवात

सौर योजनांसह वीजसेवा एकाच छताखाली; १७ ऑक्टोबरपर्यंत विशेष सेवा कक्षातून सुविधा

काशिनाथ शिंदे

मुंबई: वीजग्राहकांना विविध सेवा जलद आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणकडून राज्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या कक्षांच्या माध्यमातून ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत असून, १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने हे अभियान राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वाखाली १७ सप्टेंबरपासून या अभियानाला सुरुवात झाली आहे.

महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर (संचालन) आणि राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांनी मंगळवारी (दि. २२) दूरदृश्य प्रणालीद्वारे अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. अभियानाला आणखी गती देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. कार्यकारी संचालक (मानव संसाधन) परेश भागवत यांनी अभियानाची सविस्तर माहिती दिली.

या बैठकीला कार्यकारी संचालक भुजंग खंदारे, अंकुर कावळे, सुनील काकडे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा यांच्यासह राज्यातील मुख्य अभियंते आणि अधीक्षक अभियंते उपस्थित होते. अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी दोन उत्कृष्ट मंडलांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

सौर योजनांसाठी जागेवरच मार्गदर्शन

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत प्रत्येक तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या विशेष सेवा कक्षात विविध सौर योजनांसाठी जागेवरच अर्ज नोंदणी आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना, ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.

See also  आयटीआयमध्ये ड्रायव्हिंग स्कूलचा निर्णय ठरतोय खासगी संस्थांच्या मुळावर; शासनाविरोधात मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक आक्रमक

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, आर्थिक लाभ, सौर संच बसविण्याची प्रक्रिया, कर्ज सुविधा आणि अंदाजित खर्च याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. स्थानिक बँक प्रतिनिधी तसेच निवडसूचीवरील सौर कंत्राटदारांच्या प्रतिनिधींशी थेट समन्वय साधण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रलंबित अर्जांमधील त्रुटींची पूर्तता करून त्यावर तातडीने कार्यवाही केली जात आहे. सौर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.

वीज ग्राहकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही

‘सेवा सेतू अभियान’ अंतर्गत नवीन घरगुती वीजजोडणी, नादुरुस्त रोहित्र बदलणे, वीजबिलावरील नावात बदल, मंजूर वीजभारात बदल आणि बिलिंगविषयक तक्रारींचे निवारण यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

प्रलंबित तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याबरोबरच विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी वीजयंत्रणेत स्पेसर बसविणे, तांत्रिक उपाययोजना करणे तसेच वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्याच्या सूचनाही क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

महावितरणच्या विविध सेवा आणि सौर योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या तालुक्यातील विशेष सेवा कक्षाचा उपयोग करावा आणि ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियान’चा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

  • Related Posts

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    एसबीपीआयएममध्ये ‘आरंभ’ कार्यक्रमांतर्गत चर्चासत्र संपन्न काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : “मानव संसाधन आणि मनुष्यबळ विकास हे क्षेत्र लोक आणि संस्कृतीशी संबंधित आहे. मानव संसाधन म्हणजे…

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी गरजूंना द्या; महापालिका आणि स्वच्छ संस्थेचा संयुक्त उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत होणाऱ्या साफसफाईत वापरात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी