बनावट खात्यांचा काळाबाजार उघड! ६९ नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक; आळंदी पोलिसांचा मोठा दणका

काशिनाथ शिंदे: आळंदी पिंपरी चिंचवड

इन्स्टंट ग्रँड आणि इन्स्टंट लोनच्या आमिषाला बळी पडलेल्या देशभरातील ६९ नागरिकांची तब्बल ₹१ कोटी ५६ लाखांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या ‘म्युल अकाउंट’ रॅकेटचा आळंदी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली असून, सायबर गुन्हेगारीविरोधातील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

पोलिस तपासात आरोपी विविध बँकांमध्ये बनावट अथवा इतरांच्या नावाने बँक खाती उघडून त्यांचा वापर फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी आणि पुढे वळविण्यासाठी करत असल्याचे उघड झाले. या खात्यांचा वापर करून देशभरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करण्यात आली.

आळंदी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहारांची माहिती आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचत या रॅकेटचा भांडाफोड केला.

या कारवाईनंतर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, मोबाईल सिम, ओटीपी किंवा यूपीआयशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये. तसेच आपल्या नावावरील बँक खाते दुसऱ्याला वापरण्यास दिल्यास फसवणुकीच्या गुन्ह्यात आपणही कायदेशीर अडचणीत येऊ शकता, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

पोलीसांचा इशारा :

“सहज मिळणाऱ्या पैशांच्या मोहापायी जर तुमचे बँक खाते गुन्हेगारांच्या हातात गेले, तर फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून तुमचेही नाव पोलीस नोंदीत येऊ शकते.”

ऑनलाइन व्यवहार करताना यूपीआय, मनी ट्रान्सफर, क्यूआर कोड आणि सोशल मीडियावरील आर्थिक व्यवहारांबाबत विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून, सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती हीच सर्वात प्रभावी उपाययोजना असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

See also  दहीहंडी, गणेशोत्सवावर पोलिसांची करडी नजर; अश्लील नृत्य आढळल्यास मंडळांवर थेट कारवाई
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!