आठवड्यात खड्डे बुजवा; अन्यथा रस्त्यावर उतरू!” – विनोद वरखडे यांचा महापालिकेला इशारा

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड

पिंपरी : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने आठवडाभरात खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष विनोद वरखडे यांनी दिला आहे.

याबाबत वरखडे यांनी महापालिका आयुक्त, महापौर आणि विरोधी पक्षनेते यांना निवेदन दिले आहे. प्रदीप आवटी, अकबर शेख, स्वप्नील चव्हाण, भरत वाळके. अनुराग कुरणे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, देहू-आळंदी रस्ता, चिंचवड स्टेशन, तळवडे, मोशी-चऱ्होली मार्ग, बोऱ्हाडेवाडी तसेच चिंचवड स्टेशन ते चिखली परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नसून अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

निगडी ते चिंचवड मेट्रोच्या कामामुळेही वाहतूक विस्कळीत होत आहे. रस्ते अरुंद झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्डे दुरुस्त करताना त्यात मुरुम भरला जातो. पाऊस आल्यानंतर तो वाहून जातो. खड्डे पुन्हा उघडे पडत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे

See also  १५ तास मृत्यूशी झुंज... 'जिवंत आमिष' बनून नरभक्षक वाघिणीला जेरबंद; डॉ. प्रियल चौरागडे यांच्या धाडसाला सलाम!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!