स्वच्छता ही सेवा अभियानातून पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छतेचा जागर

१७ ऑक्टोबरपर्यंत विविध उपक्रम; नागरिकांच्या सहभागावर महापालिकेचा भर

काशिनाथ शिंदे

पिंपरी: केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात १७ ऑक्टोबरपर्यंत विविध स्वच्छता, जनजागृती आणि नागरिक सहभागाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ‘स्वच्छ भारत, विकसित भारत’ ही यंदाच्या अभियानाची संकल्पना असून, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे.

अभियानांतर्गत शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, परिसर स्वच्छता, शाळांमध्ये जनजागृती, स्वच्छता शपथ, मानवी साखळी यांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वच्छ पाठशाळा’, सफाई मित्रांसाठी विशेष उपक्रम, नागरिकांचा सहभाग तसेच टाकाऊ वस्तूंचा कलात्मक पुनर्वापर करून सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण यावरही विशेष भर देण्यात येत आहे.

कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती

कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करताना ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा अशा चार प्रकारे कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विलगीकरण केलेला कचरा महापालिकेच्या कचरा संकलन यंत्रणेकडेच द्यावा, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या घंटागाडीला कचरा देणे, घर व परिसर स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे याबाबत विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

‘स्वच्छता जीवनशैलीचा भाग व्हावी’

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग होणे आवश्यक आहे. ‘स्वच्छता ही सेवा २०२६’च्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचविण्यासोबतच नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पिंपरी-चिंचवडच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी.”

सामूहिक सहभागातून स्वच्छ शहराचे उद्दिष्ट

उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “स्वच्छ आणि निरोगी शहरासाठी नागरिकांनी दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी रुजविणे आवश्यक आहे. कचऱ्याचे योग्य विलगीकरण करणे, तो महापालिकेच्या कचरा संकलन यंत्रणेकडेच देणे तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता परिसर स्वच्छ ठेवणे, ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”

See also  गणेशोत्सवाच्या जागतिक मोहिमेसाठी प्रफुल्ल पुराणिक यांची नोडल अधिकारीपदी नियुक्ती

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासोबतच नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेकडून विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘स्वच्छ शहर, निरोगी शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांनीही या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

  • Related Posts

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    पुण्यातील १०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्य विकासावर  काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी.…

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक