सेवा सेतू अभियानांतर्गत पुणे परिमंडलात २३ किऑस्क

सौर योजनांसह महावितरणच्या विविध सेवांची माहिती एकाच ठिकाणी

काशिनाथ शिंदे

पुणे: वीजग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा अधिक सुलभ आणि वेगाने उपलब्ध करून देण्याबरोबरच सौरऊर्जा योजनांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी महावितरणकडून ‘सेवा सेतू अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पुणे परिमंडलात २३ ठिकाणी विशेष किऑस्क उभारण्यात आले आहेत.

या किऑस्कवर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, आर्थिक लाभ, सौर संच बसविण्याची कार्यपद्धती, अंदाजित खर्च आणि कर्ज सुविधांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

स्थानिक बँक प्रतिनिधी तसेच निवडसूचीवरील सौर कंत्राटदारांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक माहिती व समन्वयाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

४६४ नागरिकांनी घेतली माहिती

पुणे परिमंडलातील २३ किऑस्कला आतापर्यंत ४६४ नागरिकांनी भेट देऊन सौर योजना आणि महावितरणच्या विविध सेवांची माहिती घेतली आहे. त्यापैकी ६ नवीन अर्ज प्राप्त झाले आहेत.

पुणे शहरातील ९ किऑस्कवर २७० नागरिकांनी, तर पिंपरी-चिंचवड शहरातील १३ किऑस्कवर १८७ नागरिकांनी भेट दिली आहे. राजगुरुनगर येथील किऑस्कवरही ७ नागरिकांनी योजनांची माहिती घेतली आहे.

पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये सुविधा

पुणे शहरातील स्वारगेट, मोदी गणपती, शनिवार पेठ, नारायण पेठ, धानोरी, बाणेर, कर्वेनगर, विश्रांतवाडी आणि लोहगाव येथे किऑस्क उभारण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात रहाटणी, हिंजवडी, भोसरी आदी परिसरातील अ, ब, क, ड, ई, फ, जी, ज आणि ल या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत किऑस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे किऑस्क १७ ऑक्टोबर २०२६पर्यंत सुरू राहणार आहेत. नागरिकांनी या विशेष किऑस्कला भेट देऊन सौर योजनांची माहिती घ्यावी आणि उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  दहीहंडीचा खर्च टाळून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य!
  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर