पत्नीचा धारदार शस्त्राने खून; पतीने गॅलरीतून उडी मारल्याचा संशय

देहूगावातील ओमकार हाउसिंग सोसायटीत पहाटेची घटना; पती गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

काशिनाथ शिंदे: पिंपरी

देहूगाव : कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना देहूगाव येथील ओमकार हाउसिंग सोसायटीत रविवारी पहाटे घडली. त्यानंतर पतीने स्वतःवरही वार करून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेत शुभांगी आकाश बारस्कर (वय २८) यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती आकाश रामदास बारस्कर (वय २६) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आकाश हे एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सहाच्या सुमारास गस्तीवरील पोलिसांना देहूगावातील ओमकार सोसायटी परिसरात एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, घरमालक प्रकाश रामचंद्र राऊत यांच्या घरात भाड्याने राहणारा आकाश बारस्कर रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळून आला.

त्यानंतर पोलिसांनी घराची पाहणी केली असता, दुसऱ्या मजल्यावरील खोलीत शुभांगी या गंभीर जखमी व बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर शुभांगी यांना मृत घोषित केले. आकाश यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आकाश आणि शुभांगी यांचा डिसेंबर २०२३ मध्ये विवाह झाला होता. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून हे दाम्पत्य ओमकार सोसायटीत भाड्याने राहत होते. प्राथमिक चौकशीत गेल्या सुमारे वर्षभरापासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.

या वादातून आकाशने शुभांगी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. त्यानंतर आकाशने स्वतःवरही वार करून गॅलरीतून खाली उडी मारल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनेमागील नेमके कारण, हल्ल्याची परिस्थिती आणि इतर बाबींचा देहूरोड पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

See also  दुष्काळी परिस्थितीत महावितरणचा अतिसतर्कतेचा इशारा!
  • Related Posts

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : क्रीडा संकुलातील साफसफाई आणि टेनिस नेट बांधण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात