दुष्काळी परिस्थितीत महावितरणचा अतिसतर्कतेचा इशारा!

अभियंते, यंत्रचालक व तारमार्ग कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

काशिनाथ शिंदे

मुंबई: राज्यात पर्जन्यमानात मोठी तूट निर्माण झाल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थितीचे सावट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने संपूर्ण तांत्रिक यंत्रणेला ‘हायअलर्ट’ दिला असून, दुष्काळाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांना आपापले मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याबाबत महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी परिपत्रक जारी केले आहे.

यंदाच्या जून महिन्यापासून राज्यात पर्जन्यमानात मोठी तूट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका शेती पिकांनाही बसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विविध दुष्काळ निवारण उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार महावितरणनेही राज्यभरातील आपली तांत्रिक यंत्रणा सतर्क केली आहे.

मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या आदेशानुसार महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर (संचालन), योगेश गडकरी (वाणिज्य), सचिन तालेवार (प्रकल्प), राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांच्यासह सर्व कार्यकारी संचालकांनी विविध परिमंडलांमध्ये तातडीने दौरे केले.

या दौऱ्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीत कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक तांत्रिक कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच विविध ठिकाणच्या वीजयंत्रणेची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही

महावितरणच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

दुष्काळी परिस्थितीत शेतीसह इतर सर्व ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला वीजपुरवठा अखंडित आणि सुरळीत राहील, यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था उभारून किंवा तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

See also  मुंबई उपवर्गीकरण निर्धार महाआंदोलन : लढाईत जिंकलो, पण तहात हरलो

हयगय केल्यास शिस्तभंगाची कारवाई

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या कामात कोणत्याही प्रकारची हयगय अथवा हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही महावितरणच्या परिपत्रकातून देण्यात आला आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा तसेच सर्वसामान्य ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास महावितरणने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

  • Related Posts

    उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!

    १ ते २० नोव्हेंबरदरम्यान राज्यभर विशेष तपासणी मोहीम; प्रवाशांची लूट रोखण्यासाठी परिवहन विभाग सज्ज विनोद वरखडे प्रतिनिधी पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या…

    जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात

      आंतरराष्ट्रीय अनुभव आणि जागतिक दर्जाचे कौशल्य विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे – डॉ. गोविंद कुलकर्णी; ५५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!

    उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!

    जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात

    जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात

    कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!

    कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!

    ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!

    ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!

    राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान

    राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान

    निगडी सेक्टर २२ मधील ६४० सदनिकांवर महापालिकेचा पहारा! अनधिकृत ताबा घेतल्यास कारवाईचा इशारा

    निगडी सेक्टर २२ मधील ६४० सदनिकांवर महापालिकेचा पहारा! अनधिकृत ताबा घेतल्यास कारवाईचा इशारा