“वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी माथाडी कामगारांकडून गोसेवा”

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा महाराष्ट्र राज्य भारतीय जनता माथाडी जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवाजी (भाऊ) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत पिंपरी-चिंचवड शहरातील माथाडी कामगारांनी आगळावेगळा उपक्रम राबविला.

भारतीय जनता माथाडी जनरल कामगार युनियनचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा नामांकित पैलवान मा. विजय (भाऊ) भोसुरे यांच्या पुढाकारातून भोसरी येथील गोशाळेत टोळी क्रमांक ३३८ मधील सर्व माथाडी कामगारांच्या वतीने गोमातांना चारा अर्पण करण्यात आला. यावेळी गोमातेच्या चरणी प्रार्थना करून आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

यावेळी विजय (भाऊ) भोसुरे यांनी सांगितले की, वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून समाजोपयोगी कार्य करण्याची संधी आहे. त्याच भावनेतून गोसेवेचा हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून समाजसेवा आणि कामगार हितासाठी आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी टोळी क्रमांक ३३८ मधील सर्व माथाडी कामगारांच्या वतीने आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

See also  क्रांतिदिनी चाकणपासून संगमनेरपर्यंत रास्ता रोको; २०१६ च्या मूळ मार्गानेच रेल्वे नेण्याची जोरदार मागणी
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!