देहूरोड काँग्रेसला नवे नेतृत्व; चंद्रशेखर मारीमुत्तू यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा!

काशिनाथ शिंदे : देहूरोड

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री. चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू यांची निवड झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषद उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या वेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक मा. हाजीमलंग काशीनाथ मारीमुत्तू यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी औपचारिकरित्या नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. चंद्रशेखर मारीमुत्तू यांच्याकडे सोपविली. त्यानंतर त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार संघांचे अध्यक्ष रामकुमार अगरवाल, रमेश कांबळे, देवराम भेगडे आणि संदीप भेगडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सचिव बबन टोम्पे, किसान सेलचे अध्यक्ष संभाजी पिंजन, ओबीसी सेलचे अध्यक्ष परवेज अत्तार, कार्यकारिणी सदस्य वेंकटेश विश्वनाथ, वेंकटेश मारीमुत्तू यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. चंद्रशेखर मारीमुत्तू यांनी पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष देत काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

See also  बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयाने पुण्याच्या विकासाला मिळणार नवी दिशा!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!