अक्षय दुनघव यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

आरपीआय आठवले गटातून भाजपमध्ये प्रवेश; लांडेवाडीतील सामाजिक कार्याची दखल

काशिनाथ शिंदे

पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्षपदी भोसरीतील लांडेवाडी येथील अक्षय दुनघव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष बापू घोलप यांनी ही नियुक्ती केली. आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) दुनघव यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.

दुनघव हे यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मध्ये पिंपरी-चिंचवड शहर संघटक सचिव म्हणून कार्यरत होते. महापालिका निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता पक्षाने त्यांच्यावर अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

लांडेवाडी परिसरात अक्षय दुनघव यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली आहे. स्थानिक पातळीवर त्यांना मानणारा वर्ग असल्याने त्यांच्या नव्या नियुक्तीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नव्या जबाबदारीच्या माध्यमातून अनुसूचित जातींसह वंचित समाजघटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दुनघव यांनी नियुक्तीनंतर सांगितले. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

See also  मोरवाडी आयटीआयच्या असिफ मुलानीची थेट सौदीत ‘ज्युनियर डिझायनर’ म्हणून निवड!
  • Related Posts

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : क्रीडा संकुलातील साफसफाई आणि टेनिस नेट बांधण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात