मोरवाडी आयटीआयच्या असिफ मुलानीची थेट सौदीत ‘ज्युनियर डिझायनर’ म्हणून निवड!

हलाखीच्या परिस्थितीवर मात करत उत्तुंग भरारी; दमाम येथे मिळवली नोकरीची संधी

काशिनाथ शिंदे

पिंपरी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रशिक्षणार्थी असिफ अल्लाउद्दीन मुलानी याने आपल्या जिद्द, मेहनत आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०२१-२३ या सत्रातील ‘ड्राफ्ट्समन मेकॅनिकल’ ट्रेडचा प्रशिक्षणार्थी असिफ याची सौदी अरेबियातील दमाम येथे ज्युनियर डिझायनर म्हणून निवड झाली आहे.

असिफने आयटीआयच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता. या गुणवत्तेच्या जोरावर त्याला इनप्रो कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारीची संधी मिळाली. त्यानंतर त्याची याच कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली. प्रशिक्षणाच्या काळात त्याने उत्कृष्ट कामकाज, तांत्रिक कौशल्य, मेहनत आणि प्रामाणिकतेची छाप पाडली.

असिफच्या कामगिरीचे आणि तांत्रिक कौशल्याचे मूल्यमापन केल्यानंतर इनप्रो कंपनीने त्याची सौदी अरेबियातील मुख्य कंपनीमध्ये ज्युनियर डिझायनर म्हणून निवड केली आहे. विशेष म्हणजे, या नोकरीसाठी आवश्यक असणारा सर्व खर्च कंपनीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे एका सामान्य प्रशिक्षणार्थ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे.

पालकांचे छत्र हरपले, मात्र स्वप्नांना दिली उंच भरारी

असिफच्या यशाचे विशेष कौतुक होत आहे. त्याच्या आयुष्यात आई-वडिलांचे छत्र नसतानाही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याने शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीपुढे हार न मानता मेहनत, चिकाटी आणि तांत्रिक शिक्षणाच्या बळावर त्याने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

असिफच्या यशाने प्रेरित होऊन त्याच्या बहिणीनेदेखील मोरवाडी आयटीआयमध्ये याच ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेडमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे असिफचा संघर्ष आणि यश केवळ त्याच्यापुरते मर्यादित न राहता त्याच्या कुटुंबातील पुढील पिढीलाही प्रेरणा देणारे ठरले आहे.

परदेशातील शिक्षण-रोजगारासाठी नवा उपक्रम

मोरवाडी आयटीआयकडून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणासोबत रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांना देश-विदेशातील रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले जात आहे.

See also  ⚡ हरित ऊर्जा परिवर्तनातील महाराष्ट्राचा डंका! राष्ट्रीय परिषदेत महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचा विशेष सन्मान

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली विभागांतर्गत लवकरच ‘परदेशी शिक्षणरोजगार’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांना परदेशातील शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधींबाबत अधिक व्यापक मार्गदर्शन मिळणार आहे.

असिफ मुलानी याने मिळवलेल्या यशाबद्दल मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, गटनिदेशक आर. एस. ओव्हाळ, निदेशक व्ही. व्ही. काळोखे तसेच सर्व गटनिदेशक व निदेशक यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

असिफची यशोगाथा ही ‘परिस्थिती कितीही कठीण असली, तरी कौशल्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवता येते’, याचे जिवंत उदाहरण ठरली आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!