महिला आघाडी, युवा सेना व शिवसेनेचा पुढाकार; पोलीस-नागरिकांमधील आपुलकीचे नाते झाले अधिक दृढ
काशिनाथ शिंदे
दापोडी : फुगेवाडी-दापोडी परिसरातील महिला आघाडी, युवा सेना व शिवसेनेच्या वतीने दापोडी पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांचे कार्य, त्यांची सेवा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ते घेत असलेल्या मेहनतीबद्दल यावेळी उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी दापोडी पोलीस ठाण्याचे सचिन निकम (API), नवनाथ पवळे (PSI), मनोज जासूद (PSI) आणि सागर शेडगे (HC) यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास कोमल ताई जाधव, उपशहर प्रमुख पिंपरी विधानसभा; जयश्री वायकर, उपविभाग प्रमुख; कोमल वायकर, रेश्मा गायकवाड, भाग्यश्री बगाडे, उषा सपकाळ, कैलास जाधव, उपशहर प्रमुख पिंपरी विधानसभा; फिरोज शेख, प्रभाग प्रमुख; योगेश बहिरट, उपविभाग प्रमुख; दीपक सपकाळ, शाखाप्रमुख; तसेच दीपक बगाडे आणि विनोद शिंदे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना शहर संघटक निलेश हाके आणि प्रमोद गायकवाड यांनी केले होते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिसांना राखी बांधून त्यांच्या कार्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच पोलीस आणि नागरिकांमधील आपुलकी, विश्वास आणि बंधुभावाचे नाते अधिक दृढ व्हावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.







