‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३५४ रुग्णांची आरोग्य तपासणी

सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोथळीकर यांची युनिका सोसायटी गणेश मंडळाच्या आरोग्य शिबिरास भेट; स्वतः हिमोग्लोबिन तपासणी करून दिला नियमित आरोग्य तपासणीचा संदेश

काशिनाथ शिंदे

पुणे : ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत भोसलेनगर, हडपसर येथील युनिका सोसायटी गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरास पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोथळीकर यांनी भेट देऊन पाहणी केली. या शिबिरात तब्बल ३५४ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी दिनेश कोथळीकर यांनी शिबिरातील रुग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेऊन शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध आरोग्य सुविधांची माहिती घेतली. गणेश मंडळाचे स्वयंसेवक आणि सोसायटीच्या सदस्यांशीही त्यांनी संवाद साधला.

विशेष म्हणजे, कोथळीकर यांनी स्वतः हिमोग्लोबिनची तपासणी करून घेतली. नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी नागरिकांनी आजार होण्याची वाट न पाहता वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.

शिबिराच्या ठिकाणी सुमारे २५० सोसायटी सदस्य व गणेश मंडळाचे स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य, नियमित तपासणी, योग्य आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैली याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले.

या आरोग्य शिबिरात सर्वरोग निदान, हृदयरोग तपासणी, कर्करोग तपासणी, रक्त तपासण्या, नेत्र तपासणी, दंतरोग तपासणी, महिलांची आरोग्य तपासणी तसेच रक्तदान अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

“उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा असून, नियमित आरोग्य तपासणीमुळे आजारांचे लवकर निदान होण्यास मदत होते,” असे दिनेश कोथळीकर यांनी यावेळी सांगितले.

या प्रसंगी अभिजीत अनाप, अधीक्षक, धर्मादाय रुग्णालय, धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, पुणे; मा. जिल्हा न्यायाधीश श्री. गोसावी; सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक सागरराजे भोसले; वंश राजे भोसले; वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक समर्थ सुरवसे तसेच सामाजिक कार्यकर्ते अमित जागडे उपस्थित होते.

See also  रेल्वेचे पत्र्याचे कंपाऊंड काढा; स्मशानभूमी-दफनभूमीकडे जाणारा मार्ग खुला करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून अभियान

‘श्री गणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला आहे. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सवाच्या माध्यमातून राज्यभर हे अभियान राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचे नेतृत्व रामेश्वर भाऊ नाईक, कक्षप्रमुख, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच विशेष कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यात अभियानाचे नियोजन व समन्वय डॉ. मानसिंग साबळे, अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनीही या अभियानात सक्रिय सहभाग घेत आरोग्य तपासणी आणि जनजागृतीच्या माध्यमातून योगदान दिले आहे.

गणेशोत्सवाच्या सामाजिक सहभागाला आरोग्य जनजागृतीची जोड देत ‘उत्सव आनंदाचा, संदेश निरोगी आरोग्याचा’ हा संदेश या अभियानातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी गरजूंना द्या; महापालिका आणि स्वच्छ संस्थेचा संयुक्त उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत होणाऱ्या साफसफाईत वापरात…

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    सायंकाळच्या वीजटंचाईवर मात करण्यासाठी महावितरणचा पुढाकार; आगामी उन्हाळ्यात ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा काशिनाथ शिंदे : मुंबई Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!