भोसरीत गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष

गणेशभक्तांच्या अलोट गर्दीत गणरायाला भावपूर्ण निरोप; पारंपरिक वाद्ये, आकर्षक रथ आणि देखाव्यांनी वेधले लक्ष

काशिनाथ शिंदे

पिंपरी : भोसरी परिसरातील गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि शांततामय वातावरणात पार पडली. ढोल-ताशांचा गजर, ढोल-लेझीम पथके, पारंपरिक वाद्यवृंद आणि विविध आकर्षक रथांच्या माध्यमातून गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण भोसरी परिसर दुमदुमून गेला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरी येथील बापूजी बुवा चौकात गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळांच्या स्वागतासाठी भव्य स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. या ठिकाणी गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि कार्यकारी अभियंता किरण अंदुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

भोसरी येथील स्वागत कक्षाच्या ठिकाणी पहिली गणेश विसर्जन मिरवणूक दुपारी सुमारे दीड वाजता दाखल झाली. वीर हनुमान मित्र मंडळ, भोसरी गावठाण या मंडळाने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली. त्यानंतर एकापाठोपाठ विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या. विघ्नहर्ता मित्र मंडळ, विठ्ठल नगर, लांडेवाडी या मंडळाची गणेशमूर्ती शेवटची स्वागत कक्षातून मार्गस्थ झाली.

या मिरवणुकीत वीर हनुमान मित्र मंडळ, लोंढे तालीम मित्र मंडळ, श्री कानिफनाथ मित्र मंडळ, नव महाराष्ट्र तरुण मंडळ, हिंदवी स्वराज्य तरुण मित्र मंडळ अँड ट्रस्ट, फुगे माने तालीम मंडळ, धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, छत्रपती श्री शिवाजी तरुण मित्र मंडळ, कै. दामू शेठ गव्हाणे मित्र मंडळ, लांडगे लिंबाची तालीम मंडळ, नरवीर तानाजी मित्र मंडळ, पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळ, जय मल्हार मित्र मंडळ, खंडोबा मित्र मंडळ, मधले फुगे तालीम मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, गव्हाणे तालीम मित्र मंडळ, भगवान गव्हाणे मित्र मंडळ, विनर्स मित्र मंडळ, नाथसाहेब प्रतिष्ठान, महात्मा फुले मित्र मंडळ, भोलेश्वर मित्र मंडळ, युवा सारथी मित्र मंडळ आणि विघ्नहर्ता मित्र मंडळ आदी गणेश मंडळांनी सहभाग घेतला.

See also  महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव हाच खऱ्या सन्मानाचा पाया!

आकर्षक रथांनी वेधले लक्ष

विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध गणेश मंडळांनी सादर केलेले आकर्षक रथ, देखावे आणि पारंपरिक वाद्यवृंद हे विशेष आकर्षण ठरले. छत्रपती श्री शिवाजी तरुण मंडळाच्या राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या रथाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तर पठारे लांडगे लिंबाची तालीम व्यायाम मंडळाचा विद्युत रोषणाईने सजविलेला रथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

लांडेवाडी येथील नव महाराष्ट्र तरुण मंडळाने जगन्नाथ रथासह पारंपरिक केरळी कलाकारांच्या वाद्यवृंदासह काढलेल्या मिरवणुकीने उत्साहात आणखी भर घातली. पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

महापालिका यंत्रणेकडून नियोजनबद्ध व्यवस्था

गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता किरण अंदुरे, कार्यालयीन अधीक्षक शिवाजी खेडेकर, कार्यकारी अभियंता बाळू लांडे, उपअभियंता राजीव गाटुले, नीलेश केदार, कनिष्ठ अभियंता राधवेंद्र धर्मा कांबळे, मुख्य लिपिक धर्मा गंभीर, इस्माईल शेख, किशोर केदारी, प्रदीप गायकवाड, उमेश जगताप, जयश्री भागवत, राधिका पिंगळे, विद्या कवडे, भानुदास तापकीर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी आवश्यक नागरी सुविधा, स्वच्छता, निर्माल्य संकलन तसेच इतर आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.

पोलीस यंत्रणेसह स्वयंसेवकांचे सहकार्य

भोसरी पोलीस, वाहतूक शाखा, सीआरपीएफचे जवान तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिरवणूक सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

गणेश विसर्जन मिरवणूक स्वागत कक्षातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले.

  • Related Posts

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    पुण्यातील १०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्य विकासावर  काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी.…

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक