महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव हाच खऱ्या सन्मानाचा पाया!

महावितरणच्या ‘सन्मान सौदामिनींचा’ सोहळ्यात नवदुर्गांचा गौरव; महिला कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव

काशिनाथ शिंदे: पुणे

महिलांच्या योगदानाची जाणीव ठेवणे, त्यांच्या कार्याचा आदर करणे आणि त्यांच्या कर्तृत्वाला योग्य सन्मान देणे, हाच खऱ्या अर्थाने महिलांच्या सन्मानाचा पाया आहे, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले.

महावितरणमध्ये कार्यरत महिला अभियंता, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी गणेशखिंड येथील प्रकाशभवन सभागृहात बुधवारी (दि. १४ ऑक्टोबर) ‘सन्मान सौदामिनींचा’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की, महिलांना विविध आघाड्यांवर अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. घर, कुटुंब आणि कार्यक्षेत्र अशा विविध स्तरांवर त्या आपले योगदान देत असतात. त्यांच्या प्रयत्नांची आणि योगदानाची जाणीव ठेवणाऱ्या पुरुषांच्या मनात महिलांविषयीचा आदर आपोआप वाढतो.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर होते. त्यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी असलेल्या कालबाह्य योजनांना काळानुरूप नवे स्वरूप देतानाच संचालक राजेंद्र पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत भरघोस वाढ केली आहे. महिला एखादे काम पूर्ण करण्याचा निर्धार करतात, तेव्हा ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाहीत. त्यांच्या जिद्दीचा, मेहनतीचा आणि कर्तृत्वाचा गौरव होणे आवश्यक आहे.

या सोहळ्यात कार्यकारी अभियंता अपर्णा मुनशेट्टीवार, जलतरणपटू नेहा बनसोड, हिना कुरणे, अनिता वाकसे, भाग्यश्री जोशी, नितल हासे, शितल बोथे आणि सुरभी टाकसाळे यांनी आपले अनुभव कथन केले. आपल्या कार्यक्षेत्रातील आव्हाने, अनुभव आणि यशस्वी वाटचालीतील विविध पैलू त्यांनी उपस्थितांसमोर मांडले.

महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

या कार्यक्रमाला प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, सुरेश सवाईराम, सहायक महाव्यवस्थापक (विवले) कीर्ती भोसले, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) सत्यजित राजेशिर्के व दीप्ती अंबेकर, कार्यकारी अभियंता अपर्णा मुनशेट्टीवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे आणि उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटणी यांच्यासह महावितरणमधील महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  थरमॅक्स चौकातील केक शॉपमध्ये खळबळ; चॉकलेट पेस्ट्रीत काचेचा तुकडा आढळल्याचा ग्राहक महिलेचा आरोप

कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना गुलाबपुष्प आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. भक्ती जोशी आणि स्वागती सोळंकुरे यांनी सूत्रसंचालन केले, तर अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी आभार मानले.

  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर