अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी!

चिखली पोलिसांच्या तपासाला यश; पिंपरी सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात आरोपी कुणाल पांडुरंग वावळे (वय ३०, रा. नेवाळे वस्ती, चिखली, पिंपरी-चिंचवड) याला पिंपरी-चिंचवड जिल्हा सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. शिरभाते यांनी बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी हा निकाल दिला. या प्रकरणात आरोपीला २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

२०२१ मध्ये दाखल झाला होता गुन्हा

चिखली पोलीस ठाण्यात दि. १५ डिसेंबर २०२१ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०९/२०२६ असा नमूद करण्यात आला असून, भारतीय दंड विधानातील कलम ३७६(एन) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्यातील (पोक्सो) विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ भोये यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान चिखली पोलिसांनी न्यायालयीन कामकाजाचा पाठपुरावा केला.

पोलिसांचा पाठपुरावा, सरकारी पक्षाची प्रभावी बाजू

न्यायालयीन कामकाजादरम्यान महिला पोलीस हवालदार माया हरिदास कोल्हे यांनी सर्व साक्षीदारांना न्यायालयात उपस्थित ठेवण्यासाठी समन्वय साधला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे यांनी साक्षीदारांना मार्गदर्शन केले. या प्रकरणाचे दत्तक अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी न्यायालयात सातत्याने पाठपुरावा केला.

सरकारी अभियोक्ता प्रेमकुमार अगरवाल यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. पोलिसांचा पाठपुरावा आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर १४ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने निकाल जाहीर केला.

दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेची तरतूद

न्यायालयाने पोक्सो कायद्यातील कलम ५(एल) व ५(जे)(ii) अंतर्गत आरोपीला २० वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. तसेच पोक्सो कायद्यातील कलम ११ व १२ अंतर्गत एक वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला असून, दंड न भरल्यास एक महिन्याची सक्तमजुरी भोगावी लागेल. या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

See also  ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-४) श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे आणि प्रकरणाचे दत्तक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत असून, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये तपास, न्यायालयीन पाठपुरावा आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारे दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यावर भर दिला जात आहे.

  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर