पोलिसांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली!

वैभव नगरमध्ये विसर्जन मिरवणुकीतील ट्रॉलीवरील सजावट अचानक कोसळली; नागरिकांना वेळीच केले सुरक्षित

काशिनाथ शिंदे

पिंपरी  :गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वैभव नगर येथे ट्रॉलीवरील भव्य सजावटीचे साहित्य अचानक मागील बाजूस कोसळल्याची घटना घडली. मात्र, बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत तत्काळ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणत्याही वाहनाचे नुकसान झाले नाही.

गणपती विसर्जन करून मिरवणूक पवनेश्वर मंदिराच्या दिशेने जात असताना इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर ट्रॉलीवरील सजावट अचानक मागील बाजूस कोसळण्यास सुरुवात झाली. त्यावेळी बंदोबस्तावर असलेले मपोहवा १८२४ आनंदकर, मपोहवा ३०९५ माकोडे, पोलीस कॉन्स्टेबल २०२८ बन्ने, लोकरक्षक पोलीस कॉन्स्टेबल २६१३ पवळ, राखीव पोलीस कॉन्स्टेबल ५७२ चौधरी, वार्डन मराठे आणि वार्डन कोकणे यांनी क्षणाचाही विलंब न करता परिस्थिती हाताळली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी उपस्थित नागरिकांना बाजूला केले. ट्रॉलीच्या मागील बाजूस असलेली वाहने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांनाही बाजूला करून सुरक्षित अंतरावर थांबविण्यात आले. नागरिकांना सुरक्षित केल्यानंतर ट्रॉलीवरील सजावटीचे साहित्य रस्त्यावर कोसळले.

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ रस्त्यावर पडलेले सजावटीचे साहित्य बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक माहितीनुसार, सदर गणेश मंडळ लाल बहादूर शास्त्री मंडळ, पिंपरी भाजी मंडई येथील असून ट्रॉलीवरील सजावटीचे काम ए. टी. डेकोरेशन यांनी केले होते.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे प्रसंगावधान कौतुकास्पद ठरले.

See also  कामगाराच्या मृत्यूप्रकरणी अभियंता-ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
  • Related Posts

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    सायंकाळच्या वीजटंचाईवर मात करण्यासाठी महावितरणचा पुढाकार; आगामी उन्हाळ्यात ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा काशिनाथ शिंदे : मुंबई Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज…

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    पुण्यातील १०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्य विकासावर  काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक