आई-वडिलांच्या चरणी संस्कारांची वंदना! दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात २६ जुलैला भव्य मातृ-पितृ पूजन व सरस्वती संस्कार सोहळा

काशिनाथ शिंदे: भोसरी

विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार, राष्ट्रप्रेम आणि भारतीय संस्कृतीची जपणूक रुजविण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता दिंडोरी प्रणित सेवा केंद्र, दिघी गणेशनगर कमान, भोसरी-आळंदी रोड येथे ‘मातृ-पितृ पूजन, श्री गुरु पूजन व  सरस्वती संस्कार सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

परमपूज्य गुरुमाऊली  आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने तसेच गुरुपुत्र आदरणीय  नितीन भाऊ आणि पुणे जिल्हा प्रेरणास्थान सतीश दादा मोटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा संस्कार सोहळा पार पडणार आहे.

“आत्मविकासातून राष्ट्र विकास” या संकल्पनेतून कार्यरत असलेल्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गामार्फत गेल्या सात दशकांपासून सामाजिक, आध्यात्मिक आणि जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आई-वडिलांप्रती आदर, गुरुजनांविषयी कृतज्ञता, चारित्र्य, शिस्त, नैतिक मूल्ये आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यात आई-वडील हे मुलांचे पहिले गुरु असून त्यांच्या आशीर्वादातूनच संस्कारांची पायाभरणी होते, तर गुरु ज्ञानाचा प्रकाश देतात आणि माता सरस्वती विद्या, बुद्धी व विवेकाचे प्रतीक असल्याचा संदेश दिला जाणार आहे. या तिन्ही पूजनातून विद्यार्थ्यांमध्ये विनयशीलता, कर्तव्यभावना आणि सुसंस्कारित जीवनाची प्रेरणा रुजविण्यात येणार आहे.

यावेळी भावी पिढी निर्व्यसनी, सदाचारी, नीतिमान, धैर्यवान, राष्ट्रप्रेमी आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविण्याचा संकल्पही व्यक्त केला जाणार आहे.

या पवित्र संस्कार सोहळ्यात प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासह आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आई-वडिलांसमवेत उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या मूल्यसंस्कार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  अमृतम मारीमुत्तू यांचे अल्पशा आजाराने निधन
  • Related Posts

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    रस्ता महामार्ग घोषित करण्याची प्रक्रिया आणि ‘बांधकाम व नियंत्रण रेषा’ निश्चितीशिवाय कारवाईचा आरोप; सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रतिज्ञापत्राचे निर्देश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : रस्ता महामार्ग…

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    काशिनाथ शिंदे पुणे : देहू–आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्गाला गती देण्यासह प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची पुणे येथे सदिच्छा भेट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती