पिंपरी-चिंचवडच्या ‘रेड झोन’ प्रश्नावर दिल्लीत खलबते; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे नागरिकांच्या न्यायासाठी जोरदार पाठपुरावा

काशिनाथ शिंदे : नवी दिल्ली

 पिंपरीचिंचवड शहरातील संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील ‘रेड झोन’मुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या दीर्घकालीन आणि गंभीर प्रश्नावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीत रेड झोनमुळे रखडलेले विकास प्रकल्प, बांधकाम परवानग्या आणि नागरिकांच्या अडचणींबाबत लक्ष वेधण्यात आले.

यावेळी संरक्षण मंत्रालय, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नावर ठोस व नागरिकांना दिलासा देणारा मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करताना शहराच्या विकासालाही गती मिळावी, यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती संरक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली.

पिंपरी-चिंचवडमधील लाखो नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा पाठपुरावा यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. रेड झोनचा प्रश्न मार्गी लागल्यास शहरातील अनेक रखडलेले विकास प्रकल्प आणि नागरिकांच्या अडचणी दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

See also  गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती
  • Related Posts

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    काशिनाथ शिंदे पुणे : देहू–आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्गाला गती देण्यासह प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची पुणे येथे सदिच्छा भेट…

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    पुण्यात प्रशासनाच्या कारवाईचे टीना शर्मा घेवारे यांच्याकडून स्वागत; संपूर्ण महाराष्ट्रात मोहीम राबविण्याची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे/पिंपरी: महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांमधील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!