“पावसात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सलाम! वाकडमध्ये रेनकोट वाटपाचा सेवाभावी उपक्रम”

काशिनाथ शिंदे : वाकड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; नगरसेविका स्नेहा कलाटे यांच्या हस्ते रेनकोटचे वितरण

वाकड : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वाकड येथे वाहतूक पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी आणि वाहतूक वॉर्डन यांना पावसाळ्यात कर्तव्य बजावताना उपयोगी पडतील असे रेनकोट वाटप करण्यात आले.

नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांच्या हस्ते रेनकोटचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी, “मुसळधार पाऊस असो वा कडक ऊन, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलीस आणि वॉर्डन अहोरात्र रस्त्यावर उभे राहून सेवा बजावत असतात. त्यांच्या निःस्वार्थ सेवेला मानवंदना म्हणून हा छोटासा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे,” असे सांगितले.

कार्यक्रमाला वाकड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे, ठाणे अंमलदार, वाहतूक विभागातील अधिकारी, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी तसेच वाहतूक वॉर्डन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

See also  धाराशिवमध्ये आरक्षण उपवर्गीकरणासाठी महामोर्चाचा एल्गार; ५९ वंचित पोटजातींना न्याय देण्याची मागणी
  • Related Posts

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    रस्ता महामार्ग घोषित करण्याची प्रक्रिया आणि ‘बांधकाम व नियंत्रण रेषा’ निश्चितीशिवाय कारवाईचा आरोप; सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रतिज्ञापत्राचे निर्देश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : रस्ता महामार्ग…

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    काशिनाथ शिंदे पुणे : देहू–आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्गाला गती देण्यासह प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची पुणे येथे सदिच्छा भेट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती