पोलीस चौकीसमोरच गोळीबाराचा थरार! अवघ्या २० मिनिटांत आरोपी जेरबंद; पुणे हादरले

काशिनाथ  शिंदे :पुणे

पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात पोलिस चौकीसमोरच भरदिवसा एका तरुणावर गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यात ख्वाजा उद्दीन नाजीर शेख उर्फ नूरू शेख हा तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास सुजल सुनील परदेशी आणि त्याच्या साथीदारांनी नूरू शेख याच्यावर तीन राऊंड गोळीबार केला. यामध्ये एक गोळी नूरू शेखच्या पाठीला लागली. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना खडक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी इम्रान नदाफ यांनी धाडस दाखवत मुख्य आरोपी सुजल परदेशी याला ताब्यात घेतले. त्यानंतर खडक पोलिसांच्या पथकाने अवघ्या २० मिनिटांत उर्वरित तीन साथीदारांनाही अटक करून गुन्ह्याचा वेगाने छडा लावला.

प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे. आरोपींविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

पोलिस चौकीसमोरच घडलेल्या या धाडसी गोळीबारामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आरोपींना अल्पावधीतच अटक करण्यात यश आल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

See also  अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!
  • Related Posts

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    इरादापत्रांसह जुने वाहन बदलून नवीन वाहन घेण्याचीही संधी; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: परवाना बंदीमुळे रखडलेल्या ऑटोरिक्षा परवान्यांना तसेच नवीन…

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    निश्चित वेळापत्रक, प्रश्नपत्रिका सुरक्षेला प्राधान्य; पुढील एक वर्ष ऑनलाइनऐवजी ओएमआर पद्धतीने परीक्षा काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!