‘ड्रग-फ्री कॅम्पस’साठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा एल्गार!

१२० शाळा-महाविद्यालयांतील ४५० प्राचार्य, मुख्याध्यापकशिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग; विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड, विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवून शैक्षणिक परिसर ‘ड्रग-फ्री कॅम्पस’ करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी व्यापक जनजागृती अभियान हाती घेतले आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या पुढाकाराने परिमंडळ क्रमांक ४ अंतर्गत आयोजित जनजागृती कार्यक्रमाला तब्बल १२० शाळामहाविद्यालयांतील सुमारे ४५० प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधीविद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन प्रेक्षागृहात हा कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर ठेवणे, शैक्षणिक संस्थांचा परिसर व्यसनमुक्त ठेवणे तसेच पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागृती निर्माण करणे, हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमात पोलीस उपायुक्त केतन खेडकर यांनी अंमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले. शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने जनजागृती करावी आणि शैक्षणिक परिसर अंमली पदार्थांपासून मुक्त ठेवण्यासाठी पोलिसांसोबत समन्वयाने काम करावे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी सहा. पोलीस आयुक्त प्रविण मोरे यांनी अंमली पदार्थमुक्त अभियानाबाबत माहिती दिली. डॉ. विल्यम साळवी, विमल फाउंडेशनचे व्यसनमुक्ती समुपदेशक, यांनी व्यसनाधीनतेचे सामाजिक परिणाम आणि व्यसनमुक्तीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. मानसोपचार विभागातील तज्ज्ञांनी व्यसनाची कारणे, त्यावर मात करण्याचे उपाय आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या मानसिक व सामाजिक समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी अंमली पदार्थांमुळे होणारे दुष्परिणाम आणि पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत माहिती दिली. उपस्थितांनी अंमली पदार्थविरोधी शपथही घेतली.

कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नसून पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

See also  कर्तव्य संपलं... पण माणुसकी नाही! रबाळे वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेशुद्ध कारचालकाला मिळाले जीवनदान

या जनजागृती अभियानाला पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावकर, अपर पोलीस आयुक्त शरद आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त केतन खेडकर यांच्या नेतृत्वाखाली गती देण्यात आली आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!