खुनाच्या प्रयत्नातील वर्षभरापासून फरार आरोपीला युनिट ३ ने पकडले

गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; पाहिजे आरोपी यादीतील आरोपी रामनगर, निगडीतून ताब्यात

काशिनाथ शिंदे

पिंपरी : खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या वर्षभरापासून पाहिजे असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ३च्या पथकाने रामनगर, निगडी येथून ताब्यात घेतले. करण उर्फ नाना रवी झोंबाडे (वय २२, रा. भीमशक्तीनगर, चिखली, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पाहिजे आरोपी यादी क्रमांक २१६२ मध्ये होता.

दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक जावळे, पोलीस हवालदार बि. व्हि. गर्जे, पोलीस अंमलदार दिलीप राठोड आणि पोलीस शिपाई खेडकर यांना खास बातमीदारामार्फत आरोपीबाबत माहिती मिळाली. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. आपले अस्तित्व लपवून तो रामनगर, निगडी येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

आरोपीविरुद्ध चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २८८/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यास अहवालासह पुढील कारवाईसाठी चिखली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट ३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

See also  आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर आता ‘स्टार रेटिंग’ची नजर; त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई
  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर