आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर आता ‘स्टार रेटिंग’ची नजर; त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई

काशिनाथ शिंदे

मुंबई,  सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत तसेच बाह्यस्रोतांमार्फत (आऊटसोर्सिंगद्वारे) दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांच्या गुणवत्तेचे आता ‘स्टार रेटिंग’च्या माध्यमातून मूल्यांकन करण्यात येणार आहे. सेवांमध्ये गैरप्रकार, अनियमितता किंवा गुणवत्तेची कमतरता आढळल्यास संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.

मुंबईतील आरोग्यसेवा आयुक्तालयात मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बाह्यस्रोतांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी यांत्रिक धुलाई, प्रयोगशाळा सेवा, रक्त तपासणी, एक्स-रे, टेलिरॅडिओलॉजी, सिटी स्कॅन, एमआरआय, वैद्यकीय उपकरणांची देखभाल-दुरुस्ती, डायलिसिस, आहार पुरवठा, स्वच्छता आणि तांत्रिक सहाय्य आदी सेवांचा आढावा घेण्यात आला.

दर्जेदार आरोग्यसेवा ही विभागाची प्राथमिकता

नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे ही विभागाची प्राथमिकता आहे. त्यामुळे बाह्यस्रोतांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सेवेचे नियमित परीक्षण व मूल्यांकन करण्यात यावे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सेवांची नियमित तपासणी करून त्याबाबतचा गुणवत्ताविषयक अहवाल सादर करावा, असे निर्देश मंत्री आबिटकर यांनी दिले.

या निकषांवर होणार रुग्णालयांचे मूल्यांकन

राज्यातील सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील सेवांचे प्रमाणीकरण आणि गुणवत्तावाढ करण्यासाठी रुग्णालयांची ‘स्टार रेटिंग प्रणाली’ सुरू करण्यात आली आहे. विशेष वैद्यकीय सेवांची उपलब्धता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, औषधांचा पुरवठा, प्रयोगशाळा सेवा, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा, प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या, स्वच्छता, उपलब्ध सुविधांचा वापर तसेच रुग्णांचे अभिप्राय आदी निकषांवर आरोग्य संस्थांचे मूल्यांकन केले जाणार आहे.

महिला बचत गटांकडून सकस आहाराचा पुरवठा

राज्यातील सर्व सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून सकस व आरोग्यदायी आहार पुरविण्याच्या उपक्रमासाठी स्थानिक आमदारांच्या सहभागाने आरोग्य समितीच्या बैठका घेण्यात याव्यात. बैठकीतील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून त्याबाबतचा अहवाल तयार करावा, असे निर्देशही देण्यात आले.

See also  दहीहंडी, गणेशोत्सवावर पोलिसांची करडी नजर; अश्लील नृत्य आढळल्यास मंडळांवर थेट कारवाई

नोव्हेंबर महिन्यात जनआरोग्य समितीची राज्यस्तरीय बैठक होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील सर्व जनआरोग्य समित्या प्रभावीपणे कार्यान्वित असाव्यात, असेही मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

एकात्मिक आरोग्य डॅशबोर्डचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांची स्टार रेटिंग प्रणाली या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आहे.

राज्यातील आरोग्यविषयक माहितीचे केवळ संकलन न करता त्याचा लोकहितासाठी प्रभावी वापर करावा. नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, हे शासनाचे धोरण असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव इ. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, शहरी आरोग्य अभियान आयुक्त डॉ. सुनील भोकरे, रुग्णालय-आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपसंचालक आणि वैद्यकीय अधीक्षक बैठकीत सहभागी झाले हो

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!