शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर

कामगार नेते काशिनाथ नखाते यांची महापालिका प्रशासनावर टीका

काशिनाथ शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी, कचरा, आरोग्य आणि रस्त्यांसह नागरिकांच्या अनेक गंभीर समस्या कायम असताना महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी हे नऊ दिवसांच्या दक्षिण कोरिया दौऱ्यावर गेल्याने कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली आहे. “शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर,” अशा शब्दांत नखाते यांनी प्रशासनाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित केला.

दक्षिण कोरियातील साउथ सेल येथे ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या परिषदेत ‘डिजिटल वॉटर एक्सलेटर प्रोग्रॅम’साठी आयुक्त सहभागी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना पाणीप्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नखाते यांनी म्हटले.

महत्त्वाच्या नागरी प्रश्नांसंदर्भात नागरिकांना भेटण्यासाठी आयुक्तांनी मंगळवार आणि गुरुवार हे भेटीचे दिवस निश्चित केले आहेत. मात्र, या दिवशीही नागरिकांना आयुक्तांची भेट मिळत नसल्याने आपल्या समस्या मांडण्यासाठी त्यांना महापालिकेचे हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप नखाते यांनी केला. शहरातील मूलभूत प्रश्नांवर नागरिकांना भेटणे आवश्यक असताना अशा परिस्थितीत परदेश दौरा कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कचरा प्रश्नावरही प्रशासनाला धारेवर

शहरातील कचरा प्रश्नावरूनही नखाते यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली. महापालिकेच्या दहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कचरा संकलन केंद्र उभारण्यास अनेकांकडून विरोध होत असताना शहरातील विविध भागांत कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सफाई कामगार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पार पाडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे नखाते यांनी नमूद केले.

खड्डे, आरोग्य सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी

शहरातील रस्त्यांवरील खड्डे, त्यातून निर्माण होणारी अपघातांची समस्या तसेच महापालिका रुग्णालयांमधील उपचार व सुविधांशी संबंधित अडचणींकडेही नखाते यांनी लक्ष वेधले. नागरिकांना आरोग्य सुविधा मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने या प्रश्नांना प्राधान्य देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

See also  कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी यशवंतभाऊ भोसले आक्रमक!

आयुक्त विजय सूर्यवंशी महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून सामान्य नागरिक, गरीब, कष्टकरी, कामगार, गृहप्रकल्प लाभार्थी आणि हॉकर्स यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाबद्दल असंवेदनशीलतेची भावना निर्माण झाली असल्याचा दावा नखाते यांनी केला.

शहराच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज असताना प्रशासनातील प्रमुख अधिकारी परदेश दौऱ्यावर असणे नागरिकांच्या दृष्टीने चिंतेचे असल्याचे त्यांनी म्हटले.

‘कोरियातून शहरासाठी ठोस योजना घेऊन यावे’

“आयुक्तांनी कोरिया दौऱ्यावरून परतताना पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी, कचरा, आरोग्य आणि रस्त्यांच्या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी ठोस योजना घेऊन यावी. तसेच शहराच्या हिताचे आणि शहराचा नावलौकिक वाढविणारे एखादे ‘गिफ्ट’ घेऊन यावे,” अशी उपरोधिक अपेक्षाही कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केली.

  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर