‘अजितदादा जनसेवा सप्ताह’ अंतर्गत चिंचवडे नगरात स्वच्छतेचा जागर; श्रमदानातून दिला स्वच्छ शहराचा संदेश!

काशिनाथ शिंदे :पिपंरी

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘अजितदादा जनसेवा सप्ताह’ अंतर्गत चिंचवडे नगर परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गुरुमैया शाळा ते संकल्प चौक या परिसरात झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

परिसर स्वच्छ ठेवणे, नागरिकांचे आरोग्य निरोगी राखणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. या अभियानात स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी श्रमदान करत परिसराची स्वच्छता केली आणि स्वच्छता हीच खरी सामाजिक जबाबदारी असल्याचा प्रभावी संदेश दिला.

या स्वच्छता मोहिमेदरम्यान विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सामाजिक कार्यकर्ते धनंजय वाल्हेकर, पाटीलबुवा चिंचवडे, मोतीलाल पाटील आणि कमलाकर गोसावी यांच्यासह प्रभागातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, “स्वच्छ शहर, निरोगी नागरिक” हा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला. सहभागी नागरिकांनी अशा सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

See also  आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत डीवायपीसीओई आणि पीसीसीओईआर विजयी
  • Related Posts

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    इरादापत्रांसह जुने वाहन बदलून नवीन वाहन घेण्याचीही संधी; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: परवाना बंदीमुळे रखडलेल्या ऑटोरिक्षा परवान्यांना तसेच नवीन…

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    निश्चित वेळापत्रक, प्रश्नपत्रिका सुरक्षेला प्राधान्य; पुढील एक वर्ष ऑनलाइनऐवजी ओएमआर पद्धतीने परीक्षा काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!