कर्तव्य संपलं… पण माणुसकी नाही! रबाळे वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेशुद्ध कारचालकाला मिळाले जीवनदान

काशिनाथ शिंदे: नवी मुंबई

कर्तव्याची वेळ संपल्यानंतरही माणुसकीचा धर्म जपत रबाळे वाहतूक शाखेतील दोन पोलीस शिपायांनी प्रसंगावधान दाखवत बेशुद्ध कारचालकाचे प्राण वाचवले. त्यांच्या धाडसी आणि तत्पर कृतीमुळे एका नागरिकाला वेळेत उपचार मिळाल्याने सर्व स्तरातून या दोन्ही पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

१७ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास रबाळे वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई सचिन ढाले आणि पोलीस शिपाई सचिन सुळ हे नियमित कर्तव्य आटोपून घरी जात होते. त्यावेळी रबाळे येथील रिलायन्स उड्डाणपुलावरील बेलापूर मार्गावर एका कारने दुभाजकाला जोरदार धडक दिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दोन्ही पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारची पाहणी केली असता चालक बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळून आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता चालकाला सीपीआर (हृदय-फुफ्फुस पुनर्जीवन प्रक्रिया) दिली. काही क्षणांतच चालकाला शुद्ध आली.

यानंतर पोलिसांनी तातडीने चालकाला रबाळे येथील गवळी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. वेळेवर दिलेल्या सीपीआरमुळे चालकाचा जीव वाचल्याची माहिती समोर आली आहे.

रबाळे वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई सचिन ढाले आणि सचिन सुळ यांनी दाखवलेल्या धाडस, तत्परता आणि माणुसकीमुळे पोलीस दलाची संवेदनशील प्रतिमा अधिक उजळली आहे. त्यांच्या या कार्याचे नागरिकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडूनही विशेष कौतुक करण्यात येत आहे.

See also  पुणे मशीन टूल एक्स्पो आणि फॅक्टेक २०२६चे दिमाखात उद्घाटन ११ हजार चौ.मी. प्रदर्शनात १७५ हून अधिक कंपन्यांचा सहभाग; १८ हजारांहून अधिक व्यावसायिक अभ्यागत येणार
  • Related Posts

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    इरादापत्रांसह जुने वाहन बदलून नवीन वाहन घेण्याचीही संधी; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: परवाना बंदीमुळे रखडलेल्या ऑटोरिक्षा परवान्यांना तसेच नवीन…

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    निश्चित वेळापत्रक, प्रश्नपत्रिका सुरक्षेला प्राधान्य; पुढील एक वर्ष ऑनलाइनऐवजी ओएमआर पद्धतीने परीक्षा काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!